Uncategorized

हिंगोली : चंदन तस्करप्रकरणी एक ताब्‍यात, साथीदार पसार

Pudhari News

हिंगोली: पुढारी वृत्तसेवा;औंढा नागनाथ तहसीलसमोरील लोहरा रोडवर आज (गुरुवार) पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी एका कारची तपासणी केली. यामध्‍ये चंदनाचे लाकूड आढळली. चंदनाचे लाकूड व कार असा तीन लाखाचा ऐवज पाेलिसांनी जप्त केला आहे.

औंढा नागनाथ पोलिस ठाण्याचे पथक गस्तीवर हाेते. त्यांना लोहरा रोडवर इंडीगो कार ( एमएच- ०१-एई – ०६५९) दिसून आली. पोलिसांनी चालकासह कारमधील व्यक्तींची चौकशी सुरू केली. दोघांचीही घाबरगुंडी उडाली. कारची तपासणी केली असता त्यामध्ये चंदनाचे लाकूड आढळून आले. हे लाकूड शिरला येथून लोहरा गावाकडे नेले जात असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. पोलिसांनी उमाकांत विठ्ठलराव बोंगाने ( रा.उमरा, ता. औंढा) यास ताब्यात घेतले. तर अंधाराचा फायदा घेत बाेंगाने याचा साथीदार दिनेश जाधव पसार झाला. 

पोलिसांनी सुमारे एक लाख रुपयांचे चंदन व दोन लाख रुपये किंमतीची कार असा तीन लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणी औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. औंढयाचे पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे, सहायक पोलिस उपनिरीक्षक दिनकर विरकर, ज्ञानेश्वर गोरे, अतुल बोरकर, गजानन गडदे, संतोष धनवे यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT