Uncategorized

हटके हेअर स्टाईल  | पुढारी

Pudhari News

हटकेबाज फॅशन करण्यासाठी तरुणाई नेहमीच पुढे असते. चारचौघांत उठून दिसण्याबरोबरच दुसर्‍यांवर फुल्ल टू इंप्रेशन मारण्यासाठी तरुणाई भन्नाट अशा स्टाईल करू लागल्या आहेत. यापैकीच एक म्हणजे हेअर स्टाईल होय. नवनव्या हेअर स्टाईलने तरुणाईला भुरळ घातली आहे.

सगळ्यांनाच स्टाईलमध्ये राहण्याची आवड असते. त्यामुळे घरगुती समारंभ, पार्टी, भेटी अशा कार्यक्रमांसाठी नवनव्या फॅशनचा विचार नेहमीच केला जातो. अशा कार्यक्रमांमधून हटके दिसायला प्रत्येकांना आवडते. कपड्यांसोबत आपल्या व्यक्तिमत्त्वात, सौंदर्यात हेअर स्टाईलदेखील मोलाची भर घालते. त्यामुळे चांगला ड्रेस, मेक-अप असूनही केस नीट नसेल त्याचा काहीच उपयोग नाही. म्हणजेच केसांची ठेवण व स्टाईलदेखील तेवढीच महत्त्वाची आहे. केसांमुळे एक वेगळंच सौंदर्य प्राप्त होते. सकाळी एक तर संध्याकाळी दुसरीच हेअर स्टाईल करणारे काही तरुण आहेत. प्रत्येक ड्रेस स्टाईलनुसार हेअर स्टाईलही बदलणारे बहाद्दर आहेत. आवडता हिरो किंवा खेळाडूंची हेअर स्टाईल करण्याचा तर ट्रेंडच आहे. इंटरनेटवर तर हेअर स्टाईलसंबंधी अ‍ॅप्स आली आहेत. यामुळे केसांची निरनिराळी हेअर स्टाईल करणे सोपे झाले आहे. पांरपरिक हेअर स्टाईलपासून साईड क्रॉप, बेड हेड, द हॉट रेट्रो लूक हे स्टाईल देखील तरुणाईला आकर्षिक करत आहे.

 –  शेखर दुग्गी

SCROLL FOR NEXT