पुढारी ऑनलाईन: सुनील बिरेदार, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
मैत्री म्हणजे काय तर, असं नातं जे शब्दात वर्णन करता येणार नाही. मैत्री म्हणजे आयुष्यभराची साथ, मैत्री म्हणजे विश्वासाचं नातं, मैत्री म्हणजे दोन जीव एक श्वास, मैत्री म्हणजे सुख-दुःखाची साथ, मैत्री म्हणजे निखळतं झऱ्याचं पाणी.
मैत्री ही कधीच ठरवून होत नसते. समोरच्या व्यक्तीची मानसीकता आणि स्वभाव जाणून घेऊन केलेले नाजूक आणि अतूट नातं म्हणजे मैत्री. कधी कधी आपल्याला न आवडणारी व्यक्ती देखील आपल्याला आवडून जाते. जीवनाच्या प्रत्येक क्षणाला आपली साथ देते ती म्हणजे मैत्री.
आपल्यावर भांडतात, रागावतातही पण आयुष्यभर साथ देतात ती म्हणजे मैत्री. एकदा केलेली मैत्री जीवनभर साथ देते. जरी एकमेकांन सोबत आपण भांडलो तरी पण ती मैत्री ही मैत्रीच असते. मैत्रीत समजावून सांगणे, चिडणे हे तर मैत्रीचं घट्ट नातंच आहे.
शालेय जीवनातून झालेली मैत्रीची सुरवात. कॉलेज जीवनातील मैत्री अखंड टिकते. कॉलेज जीवनातील मैत्री म्हणजे कॅन्टीन कट्याच्या गप्पा, एकत्र खाल्लेला डबा, लेक्चर चुकवून केलेली मजा, कोणाच्यातरी नावाने चिडवलेली चेष्टा, मैत्रीचं घट्ट नातं असं असतं.
आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर मैत्री साथ देते. मनातील भावना ओळखून जीवनाला दिशा देते ते नातं म्हणजे मैत्री. कधी कधी रक्त संबंध नसून देखील आयुष्याच्या वाटेवर एकत्रित मदत करते ती म्हणजे मैत्री..
असं म्हणतात प्रेम हे मनाशी मनाला जोडते पण मैत्री ही मनाच्या भावनांना एकत्रित करते. एक विश्वासाचं जाळ निर्माण करते. कोणताही स्वार्थ नसतो ती म्हणजे मैत्री, एका भेटीत आभाळाएवढी उंची गाठते ती म्हणजे मैत्री.