मुंबई: पुढारी ऑनलाईन
ऑगस्ट महिना सुरू झाला की, वेड लागतात ते फ्रेंडशिप डेचे. अनेक जण या दिवशी आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला कसे खुश ठेवु शकले याची खबरदारी घेत असतात. 'फ्रेंडशिप डे' हा दिवस तारखेनुसार नाही तर, दिवसानुसार साजरा केला जातो.
ऑगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी हा दिवस साजरा केला जातो. दरवर्षीच्या ऑगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी जी तारीख असेल त्या तारखेला त्या वर्षीचा 'फ्रेंडशिप डे' साजरा केला जातो. आपली मैत्री आपल्यासाठी जितकी रंजक ठरते तितकाच त्याचा इतिहासही रंजक आहे. या डे चा इतिहास वाचुन तुमचे मनदेखील भावुक होऊन जाईल.. जाणून घेऊयात फ्रेंडशिप डेचा भावुक इतिहास…
फ्रेंडशिप डे चा इतिहास
फ्रेंडशिप डेची सुरूवात १९३५ मध्ये अमेरिकेतून झाली. ऑगस्टच्या पहिल्या रविवारी अमेरिका सरकारने एका निर्दोष व्यक्तीला मारले होते. त्याच्या हत्येचे सर्वात जास्त दुःख त्याच्या मित्राला झाले होते. मित्राच्या विरहात त्याने आम्तहत्या केली.
त्यांचे हे मैत्री प्रेम पाहता अमेरिकेतील नागरिकांनी ऑगस्टचा पहिला रविवार हा मैत्री दिन म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव सरकारपुढे ठेवला, मात्र अमेरिका सरकारला ही गोष्ट मंजुर नव्हती. २१ वर्ष लोक हा प्रस्ताव घेऊन लढत होते. अखेर१९५८ मध्ये अमेरिका सरकारने नागरिकांच्या प्रस्तावला मान्यता दिली आणि ऑगस्टचा पहिला रविवार हा फ्रेंडशिप डे म्हणून साजरा करण्यात आला.
यानंतर संयुक्त राष्ट्र संघाने २७ एप्रिल २०११मध्ये झालेल्या बैठकीत ३० जुलै हा दिवस ' आंतरराष्ट्रीय फ्रेंडशिप डे' म्हणून अधिकृतरित्या साजरा करण्यात आला होता. मात्र, काही वर्ष झाले ऑगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी भारतात 'फ्रेंडशिप डे' मोठ्या प्रमाणावर साजरा केला जात आहे. तसेच भारतासोबत दक्षिण अशियातील काही देशाही साजरा करतात.
काही देश मात्र 'फ्रेंडशिप डे' साजरा करतात पण, तो ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी नव्हे. तर, त्यांना सोईच्या असणाऱ्या दुसऱ्या वेगवेगळ्या दिवशी. ८ एप्रिलला ओहायोच्या ओर्बालिनमध्ये 'फ्रेंडशिप डे' साजरा केला जातो. तर, जगभरातील अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या तारखेला 'फ्रेंडशिप डे' साजरा केला जातो.