Uncategorized

मलवडीत विहिरीत बुडून बाप-लेकाचा मृत्यू

Pudhari News

करमाळा : तालुका प्रतिनिधी

मलवडी, ता. करमाळा येथे विहिरीत बुडून बाप-लेकाचा मृत्यू झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. शिवाजी भीमराव कोंडलकर (वय 35) व सार्थक ऊर्फ सोनू शिवाजी कोंडलकर (11) असे विहिरीत बुडून मृत्यू पावलेल्या बाप-लेकाचे नाव आहे.

आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घडना घडली आहे.  शिवाजी कोंडलकर हे मुलाला पोहायला शिकवण्यासाठी  घरामागील  विहिरीवर गेले होते. करमाळा तालुक्यातील मलवडी येथील दुर्गुळे कोंडलकर वस्ती येथील विहिरीत मुलाला पोहायला शिकवताना मुलाच्या पाठीवर बांधलेला ड्रम निसटल्याने मुलाने वडील शिवाजी  कोंडलकर यांना मिठी मारली. त्यामुळे वडिलांना हालचाल करता आली नाही. त्यामुळे दोघांच्याही मृत्यूची चर्चा ग्रामस्थांमधून होत आहे. 

पोहायला गेलेले दोघे परत का आले नाहीत, म्हणून घटनास्थळी पाहणी केली असता हा प्रकार उघडकीस आला आहे.  सोनू शिवाजी कोंडलकर हा अजितदादा पवार विद्यालय वडशिवणे येथे सहावीमध्ये शिकत होता.

विहिरीत जास्त पाणी असल्याने दुपारपर्यंत दोघांचे मृतदेह सापडले नव्हते. आठ मोटारींच्या सहाय्याने पाणी काढल्याने दोघांचेही मृतदेह हाती लागले. घटनास्थळी ग्रामस्थ व पोलिस प्रशासनाचे दुपारपर्यंत पाणी उपसण्याचे काम सुरू होते. दुपारनंतर दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी करमाळा येथे आणलेे. रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले.करमाळा पोलिसांनी या दुर्घटनेची आकस्मात मृत्यूची नोंद पोलिस दप्तरी केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT