Uncategorized

जागतिक मधूमेह दिन : मधुमेहाला दूर ठेवा 

Pudhari News

मधुमेह किंवा डायबेटिस मेलिटस एक राष्ट्रीय समस्या बनलेली आहे, लाखो नाही तर करोडो देशभरातील व्यक्‍ती आज मधुमेहाच्या विळख्यात सापडलेल्या आहेत. नवनवीन औषधेसुद्धा तेवढ्याच प्रमाणात बाजारात उपलब्ध आहेत पण बराच काळ किंवा अनेक वर्षे मधुमेहाला नियंत्रण करणारी औषधे अजूनही  उपलब्ध नाहीत, दररोज नवनवीन मधुमेही रुग्णांची भर पडत चालली आहे. हजारो नवीन रुग्ण मधुमेही म्हणून संपूर्ण जगतामध्ये रक्‍ताच्या चाचणी अंती आढळून येत आहेत. या लेखाव्दारे प्रथम मी नवीन किंवा वर्षभरामध्ये मधुमेह झालेल्या रुग्णांसाठी व नंतर अनुक्रमे पाच, दहा, पंधरा वर्षे मधुमेह या व्याधिने ग्रस्त असणार्‍यांसाठी जागतिक मधुमेह दिनाच्या निमित्‍ताने बहुमुल्य असा सल्‍ला देणार आहे. 

नव्यानेच वर्षभरामध्ये मधुमेह झालेल्या रुग्णांनी आपल्याला मधुमेहापासून मुक्‍ती कशी मिळेल? यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपणास प्रश्‍न असा पडेल की मधुमेह पूर्ण बरा होऊ शकतो काय? होय जर आपले नव्यानेच मधुमेही म्हणून निदान झाले असेल. तर सर्वप्रथम आपण सकाळचा बे्रकफास्ट बंद कराच त्याऐवजी सकाळी जेवण घेणे आपणास उपयुक्‍त ठरणार आहे. बाजारा मधील बेकरी प्रॉडक्टस आपणास सोडण्याची वेळ आली आहे. . 

कच्चा पालेभाज्याऐवजी कडधान्यांचा अंतर्भाव आपल्या आहारामध्ये करा. कच्च्या पालेभाज्या सेवन करताना काळजी घेणे गरजेचे आहे, कारण भाज्यांवर पेस्टिसाईडस वापरलेले असल्यामुळे व स्वरस हा नेहमी जर? असल्यामुळे रक्‍तदोष निर्माण करू शकतो. गायीचे दूध अमृताप्रमाणे कार्य करते. चहा ऐवजी दुध घेणे आपल्या आरोग्यासाठी हितकर आहे. दूध गरम करून प्यावे, कच्चे दूध पिणे. शक्यतो टाळणे गरजेचे आहे. गाइूचे दुध गरम करून उकळून घेतल्यास दुधामध्ये  आलेली कृत्रिम संप्रेरके नष्ट होतात. गाईला दुधाचे प्रमाण वाढवीण्यासाठी दिलेली संप्रेरके दुध उकळल्यावर नष्ट होतात. कोणतेही व्यसन मधुमेही व्यक्‍तींना असणे भावी आयुष्यासाठी धोकादायक ठरू शकते. आरामदायी जीवनशैली, चरबीयुक्‍त आहार टाळणे फार आवश्यक आहे.

नवीन मुधमेह झालेल्या रुग्णांनी प्रथम वजन कमी करण्यावर भर द्यावा, टाईप प्रकारामध्ये रुग्णांचे वजन कमी झाल्यास 'इन्सुलिन चा प्रतिरोध ' सुध्दा कमी होऊन अश्या रुग्णांमध्ये 'मधुमेह मुक्‍त' अवस्था येऊ शकते. व्यायाम अत्यंत महत्त्वाचा असून आपल्या जीवनशैली मध्ये व्यायामाचा अंतर्भाव प्रत्येक मधुमेही रुग्णाने केलाच पाहीजे एकाच प्रकारच्या आहार सतत न घेता, आहारामध्ये बदल करावा. आहाराच्या वेळा नियमित ठेवाव्यात पाच वर्षावरील मधुमेही रुग्णांनी पथ्य सोबत डोळ्यांची पायांची विशेषत : पायाच्या संवंदना, रक्‍तपुरवठा, हृदयाच्या तपासण्या, किडनीच्या संदर्भातील तपासण्या आपल्या तज्ज्ञांकडून करून घ्याव्यात.

आपल्या आहारामध्ये अचानक बदल करणे घातक ठरू शकते, वेगवेगळे, आहाराचे पॅटर्न आपल्या जीवनशैलीमध्ये अंतर्भाव करण्यापूर्वी आपल्या वैद्यकिय तज्ञांचा सल्‍ला घ्यावा. दहा वर्षापेक्षा जास्त कालावधी पासून मधुमेह असणार्‍यांनी आपल्या पायाची काळजी अत्यंत काटेकोरप्रमाणे घेणे गरजेचे आहे. तळ पायाच्या संवेदना कमी होऊ नये म्हणून  दररोज रात्री एरंण्डतैलाने पायाच्या तळभागाला मसाज करावा. मूत्राद्वारे बाहेर जाणार्‍या मायक्रोअल्ब्युमिन  जाणून घ्यावे. दहा वर्षापेक्षा जास्त काळ मधुमेह असल्यास प्राणायाम, पोहणे, चालणे, सायकलिंग या सारखे व्यायाम करण्यापूर्वी तज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे. मधुमेहाचा कोणताही प्रकार ? असल्यास डोळे, किडणी, हृदय, मज्जा संस्था यांच्या संदर्भातील योग्य त्या तपासण्या आपण तज्ज्ञांव्दारे करून घ्याव्यात.  

आपली औषधे 'लिस्ट मधून कमी कशी होतील यासाठी प्रयत्न करणे प्रत्येक मधुमेही रुग्णांचे कर्तव्य आहे. मधुमेह व उच्चरक्‍तदाब, हृदयरोग, किडनी, डोळ्यांचे आजार असल्यास नेहमी वैद्यकिय सल्ल्याने वागावे. '

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT