Uncategorized

मराठा आरक्षणावर मार्ग निघत नाही, तोपर्यंत मी गप्प बसणार नाही; छत्रपती संभाजी राजेंचा इशारा

Pudhari News

कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. राजकीय वर्तुळात अनेक आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. मराठा आरक्षणाबद्दल लवकरच भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगत जोपर्यंत मार्ग निघत नाही, तोपर्यंत मी गप्प बसणार नाही, असा इशारा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे. 

वाचा ः कोरोना : बाबा रामदेवांच्या औषधाला मान्यता नाही; तरीही केंद्रीय मंत्री वाटताहेत 'कोरोनिल'

माध्यमांशी बोलताना खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केले. आरक्षणासंदर्भात वेगवेगळ्या पक्षाची वेगवेगळी भूमिका आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाबद्दल लवकरच भूमिका जाहीर करणार असल्याचे त्यांनी म्हंटले. तसेच, सध्या राज्य कोरोना महामारीचा सामना करत आहे. त्यामुळे आंदोलन करू नका, असे आवाहन मराठा नेत्यांसह कार्यकर्त्यांना त्यांनी यावेळी केले. या सोबतच मराठा आरक्षणावर मार्ग निघणारच, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. 

वाचा ः कोरोनाला हरविण्यात 2-DG औषधाची मदत होणार का? 

काही दिवसांपूर्वी राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अहवालावर अधारित महाराष्ट्र विधिमंडळाने पारित केलेला मराठा आरक्षण कायदा सर्वोच्च न्यायालायाने रद्द केला. याबाबत केंद्र शासनाने सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली आहे. दरम्यान, राज्य मागासवर्ग आयोगाचा संपूर्ण अहवाल न्यायालयासमोर ठेवताना राहिलेल्या त्रूटी दूर करण्यासाठी आणि अंतिमतः मराठा आरक्षण टिकवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीनेही अशी फेरविचार याचिका दाखल करण्यसंदर्भात आवश्यक ती कार्यवाही त्वरित करण्यात यावी. अशी मागणी संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे. 

SCROLL FOR NEXT