Uncategorized

केंद्राकडून राज्यातील २१० कोरोना शहिदांपैकी ५८ जणांना ५० लाख

Pudhari News

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

कर्तव्य बजावत असताना  कोरोनामुळे मृत्यू झालेल्या राज्यातील 210 आरोग्य कर्मचार्‍यांपैकी केवळ 58 जणांना केंद्र सरकारने 50 लाख रुपये दिले आहेत. प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत केंद्र सरकारकडून वैद्यकीय क्षेत्रातील कोरोना शहिदांना विम्यापोटी 50 लाख रूपये दिले जातात. या योजनेची सुरुवात 30 मार्च 2020 ला सुरू झाली ती फक्त 90 दिवसांकरिता होती. परंतु, पुढे 24 मार्च 2021 पर्यंत वाढवण्यात आली. आता 20 एप्रिल 2021 रोजी ही योजना पुढील एक वर्षासाठी वाढविण्यात आली आहे.

राज्य सरकारने या योजनेखाली 28 एप्रिल 2021 पर्यंत 210 अर्ज  केंद्र सरकारला पाठवले होते. परंतु, त्यातील केवळ 58 अर्जदारांना विम्याचे 50 लाख रुपये दिले आहेत. याचा अर्थ एकूण  27 टक्के आरोग्य कर्मचार्‍यांच्या कुटुंबांना या योजनेचा लाभ झाला आहे.  पुणे जिल्ह्याने सगळ्यात जास्त म्हणजे 47  तर मुंबई महानगरपालिकेने  38 अर्ज केंद्र सरकारला पाठवले आहे. केंद्र सरकारने पुणे जिल्ह्यातील फक्त 3 तर मुंबईतील 22 अर्ज मंजूर केले आहेत.  

महाराष्ट्रात 78 डॉक्टर मरण पावले आहेत. त्यापैकी 19 अर्ज पाठवण्यात आले. त्यामधील फक्त 10 अर्ज मान्य करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे मुंबईतील फक्त एकच डॉक्टरचा अर्ज पाठवण्यात आला, आणि तोही मान्य झालेला नाही.

 

SCROLL FOR NEXT