केज; पुढारी वृत्तसेवा : केज येथील न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उदघाटन मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या हस्ते आज दि. १५ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता होणार होते. या कार्यक्रमानिमित्त बंदोबस्तासाठी असलेल्या गृहरक्षक दलाचे जवान अमोल ठोंबरे आणि संगीता भांगे यांच्या अंगावर लोखंडी गेट पडुन ते दोघे जखमी झाले आहेत. संगीता भांगे यांचा हात फ्रॅक्चर झाला आहे. तर अमोल ठोंबरे यांच्या पायाला गंभीर मार लागला आहे त्यामुळे न्यायालयाच्या इमारतीचे बांधकाम करणारा बांधकाम विभाग आणि गुत्तेदार हे या प्रकरणी जबाबदार असल्याची चर्चा सुरू आहे.
हेही वाचा