चिन्मय उद्गीरकर www.pudhari.news  
Uncategorized

Break time : अन सामाजिक कामात रमत गेलो…! अभिनेता, पर्यावरण प्रेमी चिन्मय उद्गीरकर

अंजली राऊत

नाशिक : दीपिका वाघ

अस्थिर असणाऱ्या अभिनयाच्या क्षेत्रात काम करताना भविष्याची चिंता असते पण मला त्याची चिंता वाटत नाही. कारण लोक माझ्याकडे केवळ अभिनेता म्हणून नाही तर कार्यकर्ता, पर्यावरण प्रेमी म्हणून बघतील याची मला खात्री आहे. पर्यावरणासाठी काम करताना मला त्यातून मानसिक समाधान मिळते, मनातला गिल्ट निघून जातो, आत्मविश्वास निर्माण होऊन आपण पर्यावरण संरक्षणासाठी काहीतरी चांगले काम करतोय त्यामुळे कोणतीही असुरक्षिततेची भावना उरत नाही.

२०१४ मधील गोष्ट असेल राजेश पंडित मला भेटांयला सेटवर आले होते. हरित कुंभासाठी ते सेलिब्रेटी बाइटच्या माध्यमातून प्रमोशन करून घेत होते. त्यासाठी त्यांना माझी बाइट हवी हाेती. तुम्ही मला कार्यकर्ता म्हणून काम करायची संधी देत असाल तर मी तुमच्यासाठी बाइट देईल आणि या एका अटीवर मी नमामी गोदा प्रकल्पाशी जोडला गेलो. नदीपात्रात प्रत्यक्ष उतरून जेव्हा काम करायला सुरूवात केली तेव्हा पात्रात पाणीच नसल्याने आपण स्वच्छ काय करणार? तेव्हा जाणवले भविष्यात बरेच मोठे काम करावे लागणार आहे. त्याकाळात वॉटरमॅन राजेंद्र सिंह यांच्याशी भेट झाली आणि महाराष्ट्रभर काम करायला सुरूवात केली. पाड्यांवर, गावागावात जाऊन लोकांना भेटत गेलो. पाण्याचे महत्त्व समजावून सांगत भूजल पातळी वाढवण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग करायला सांगितले जाते. यानिमित्ताने अनेक सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणासाठी झटणाऱ्या लोकांशी ओळखी होऊन त्यांच्याशी चांगले संबंध तयार झाले आहेत. अभिनयाव्यतिरिक्तची ती माझी मोठी फॅमिली आहे. रूट लेव्हलच्या माणसांशी काम करताना त्यांच्याकडून खरे प्रेम मिळते. प्रत्यक्ष काम करताना एक लक्षात आले की, पर्यावरणाचा ऱ्हास होत असताना लोकांमध्ये एक असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. परंतु आपण स्वत: जर पर्यावरणाशी जोडलो गेलो तर समाधान मिळते. जेव्हा शुटिंग नसते तेव्हा पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून मी काम करतो. नाशिकचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे यासाठी शहरातील प्रत्येक सामाजिक कामात सहभागी होण्यासाठी प्रयत्नशील असतो.

चित्रपट नगरीच्या माध्यमातून काम यायला हवे

आपल्या शहरावर निसर्गाने मुक्तहस्तपणे उधळण केली आहे. त्याचा उपयोग विकासासाठी केला पाहिजे. नाशिक चित्रपट नगरी व्हावी यासाठी तर प्रयत्न सुुरूच आहेत. पण केवळ चित्रपट नगरी बांधून उपयोग नाही तर ती चालती राहण्यासाठी नाशिकपर्यंत काम येणे जास्त गरजेचे वाटते. त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. नाशिकमध्ये घडणाऱ्या कलाकारांना यातून चांगले व्यासपीठ तयार होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT