Uncategorized

बीड : एसटीवर दगडफेक! वाहक व प्रवासी किरकोळ जखमी!

backup backup

केज; पुढारी वृत्तसेवा : केज तालुक्यातील कानडी माळी येथे एकाने एसटी बसवर दगड मारल्याने वाहक व प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली. यातील प्रवासी ही नऊ वर्षांची मुलगी आहे.

या बाबतची माहिती अशी की, शनिवारी (दि. ११) धारूर आगाराची केज ते जिवाचीवाडी (क्र. एम एच -२०/ बी एल-०१३८) ही बस सायंकाळी ६:१५ वाजताच्या सुमारास कानडीमाळी येथे गेली असता, बस थांब्यावर बस थांबली. त्यावेळी याच बसमधून प्रवास करीत असलेला महादेव रावसाहेब खाडे या प्रवाशाने वाहक दत्तात्रय गवळी यांच्या सोबत हुज्जत घालून भांडण केले. वाहक दत्तात्रय गवळी याला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. त्यानंतर महादेव रावसाहेब खाडे याने एसटी बसमधून खाली उतरल्यानंतर एसटी बसवर दगडफेक केली. यामध्ये एक दगड खिडकीच्या काचेतून आत घुसल्याने वाहक दत्तात्रय गवळी आणि त्याच गाडीने प्रवास करणाऱ्या किरण राठोड (वय १० वर्ष) या मुलीच्या मनगटावर दगडाचा किरकोळ मार लागला.

वाहक दत्तात्रय गवळी आणि चालक बाबुराव इंगोले यांनी एसटी बस केज पोलीस ठाण्यात आणलेली असून दगडफेक करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT