Uncategorized

Aurangabad : आज पुन्हा पैठण-पाचोड रोडवर मोटरसायकलचा अपघात

सोनाली जाधव

पैठण पुढारी वृत्तसेवा : पैठण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सलग दोन दिवसापासून अपघाताची मालिका सुरू आहे. आत्तापर्यंत तीन जणांना आपला जीव गमावावा लागला आहे. आज पुन्हा गुरुवारी (दि.२३) रोजी सकाळी पैठण-पाचोड रोडवर एका अज्ञात ट्रक वाहनाने कंपनीत चाललेल्या कामगारांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात दोन जण जखमी झाले. दोन्ही जखमी पैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. जखमींना औरंगाबाद जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (Aurangabad)

दोघेजण जखमी; जखमी पैकी एकाची प्रकृती गंभीर

अधिक माहिती अशी की, पैठण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पैठण-पाचोड रोडवर बुधवारी रोजी दुपारी मारुती कार मोटर सायकलचा अपघात घडला होता. या अपघातात दोन मजुराचा मृत्यू झाला आहे. या अगोदर सोमवार (दि.२०) रोजी रात्री खुले कारागृह परिसरातील रोडवर अज्ञात वाहनाने मोटरसायकलवरुन एरंडगाव येथे जात असलेल्या भाऊसाहेब मोतीलाल कुंढारे (रा. एरंडगाव ता. शेवगाव जि. अहमदनगर) यांना जोरदार धडक दिल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली होती.

आज पुन्हा गुरुवारी (दि.२३) सकाळी एक अपघात झाला. सावता अशोक सोनवणे (वय २३) व अंगत पंगत बारे (वय २२) हे मोटर सायकलवर कामासाठी नांदर येथून कंपनीत जात होते. दरम्यान पाचोडकड़े जाणाऱ्या अज्ञात ट्रकने जोरदार धडक दिली. यात दोघेही जखमी झाले आहेत.  ट्रक चालकांने ट्रकसह पलायन केले आहे.  माहिती मिळताच स्वराज्य संघटनेचे मराठवाडा पदाधिकारी अनिल राऊत यांनी पोलीस उपनिरीक्षक दशरथ बुरकूल व नागरिकांच्या मदतीने जखमी मजुरांना पैठण येथील शासकीय रुग्णालयात उपचारसाठी दाखल केले. परंतु या जखमी पैकी सावता अशोक सोनवणे या मजुराची प्रकृती गंभीर असल्यामुळे पुढील उपचारासाठी औरंगाबाद जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT