Uncategorized

अश्विनी बिंद्रे हत्याकांड : कुरुंदकरचा विशेष रजा अर्ज न्यायालयाने फेटाळला 

Pudhari News

पनवेल : प्रतिनिधी

महिला पोलिस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्याकांडातील मुख्य आरोपी बडतर्फ वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर यांनी पनवेल सत्र न्यायालयात एक दिवसांच्या रजेसाठी केलेला विनंती अर्ज आज (दि. २०) पनवेल सत्र न्यायालयाने फेटाळला. कुरुंदकर यांच्या पत्नीचे निधन झाले आहे. निधनाच्या धार्मिक विधीसाठी न्यायाधिशांच्या विशेष अधिकारात एक दिवसांची सुट्टी मिळावी यासाठी कुरुंदकर यांनी अर्ज केला होता. 

कुरुंदकर यांच्या पत्नीचे कोरोनामुळे गुरुवारी (दि. १५) निधन झाले होते. या निधनानंतरच्या धार्मिक विधी करण्यासाठी कुरुंदकर यांनी एक दिवस पोलिस बंदोबस्तात घरी जाण्याची सवलत मिळावी म्हणून पनवेल सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र न्यायमूर्ती माधुरी आनंद यांनी हा अर्ज फेटाळला.

यावेळी न्यायमुर्तींनी तुम्हाला जो धार्मिक विधी करायचा आहे, तो जेलमधूनचं व्हिडिओ कॉलद्वारे करावा असे सांगितले. तसेच प्रवास बंदोबस्तावरील पोलिस आणि नंतर परत आल्यावर जेलमधील अन्य कैद्याना कोरोना संसर्ग होण्याची शक्यता निर्माण होवू शकते, असे मत यावेळी कोर्टाने नोंदविले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT