Uncategorized

नाशिक : सिडकोत अज्ञात समाजकंटकांनी सात कारच्या काचा फोडल्या

Pudhari News

सिडको : पुढारी वृत्तसेवा

परिसरातील लेखानगर भागातील सुंदरबन कॉलनी येथे रविवारी (दि.१६) रात्री अज्ञात समाजकंटकांनी सात कारच्या काचा फोडून परिसरात दहशत निर्माण केल्याने नागरिकांमध्ये भिती पसरली आहे.

या बाबत पोलिसांनी माहिती दिली की, लेखानगर भागातील सुंदरबन कॉलनी येथे रविवारी रात्री दोन ते तीन दुचाकी वर ३ ते ४ अज्ञात समाजकंटक आले व त्यांनी काठी व दगडाने घरासमोर पार्किग केलेल्या सात कारच्या काचा फोडून परिसरात दहशत निर्माण केली व फरार झाले. घटनेची माहिती समजताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शना खाली सहायक पोलिस निरीक्षक गणेश शिंदे हे अधिकारी व कर्मचाऱ्यांसह दाखल झाले. अज्ञात समाजकंटकांनी कारच्या काचा का फोडल्या हे अद्याप समजू शकले नाही. काचा फोडणारे आरोपींची माहिती मिळाली असुन लवकरच त्यांना अटक केले जाईल असे पोलिसांनी सांगितले. रात्री उशिरा अंबड पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भिती पसरली आहे.

SCROLL FOR NEXT