Uncategorized

आजरा तालुक्यात पावसाची समाधानकारक सलामी

Pudhari News

आजरा : पुढारी वृत्तसेवा

आजरा शहरासह तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने समाधानकारक हजेरी लावली आहे. शुक्रवार व शनिवार या दोन दिवसांत तालुक्यात सर्वच ठिकाणी कमी-जास्त प्रमाणात पाऊस झाला आहे. पावसामुळे पेरणीच्या कामांना सुरुवात झाली असल्याने शेतकरीवर्ग पेरणीच्या कामांमध्ये वस्त असल्याचे चित्र दिसत आहे. समाधानकारक पावसाच्या हजेरीने शेतकरीवर्गातून समाधान व्यक्त होत आहे. 

गेले दोन दिवस पाऊस सुरू असून काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी तुरळक प्रमाणात पाऊस हजेरी लावत आहे. शनिवारी सकाळी 8 वाजेपर्यंतच्या गेल्या 24 तासांत आजरा मंडलमध्ये 19 मि.मी., मलिग्रे मंडलमध्ये 17 मि.मी., उत्तूर मंडलमध्ये 24 मि.मी. व गवसे मंडलमध्ये 3 मि.मी. असा एकूण 15.75 मि.मी. च्या सरासरीने 63 मि.मी. पाऊस झाला आहे. आकडेवारीवरून उत्तूर मंडलमध्ये जास्त पाऊस व गवसे मंडलमध्ये सर्वात कमी पाऊस झाल्याचे स्पष्ट होते. तालुक्याचा पश्चिम भाग हा अतिवृष्टीचा भाग म्हणून ओळखला जातो; पण अद्याप या भागात मोठ्या पावसाला सुरुवात झाली नसल्याचे दिसते. पावसामुळे किटवडे येथे संजय भिकाजी पाटील यांच्या घराची पडझड झाली आहे. 

मान्सून पाऊस वेळेत दाखल होणार असल्याने यापुर्वीच तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकर्‍यांनी धूळवाफ पेरणी करून घेतली आहे. त्यामुळे या पावसाचा या पेरणीला फायदा होणार असल्याने शेतकरी सुखावला आहे. तर पश्चिम भागात भात तरवे टाकण्याची लगबग सुरू असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

SCROLL FOR NEXT