बुलडाणा : पुढारी वृत्तसेवा ; आई-मुलाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना जिल्हयात शनिवारी रात्री घडली. ४५ वर्षीय मुलाने आपल्या आईवर अत्याचार केल्याचा घृणास्पद कृत्य उघडकीस आले आहे. आरोपी मुलाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून तो फरार आहे.
अधिक वाचा : गडचिरोली : जिल्ह्यात सोमवारपासून सर्व दुकाने ७ ते ४ वाजतापर्यंत सुरू
हमाली करणार्या नराधमाने आपल्या ६५ वर्षीय आईवरच अत्याचार केला. पत्नी माहेरी गेली असल्याने आई एकटीच हाेती. यावेळी या नराधमाने हे घृणास्पद कृत्य केले. रविवारी सकाळी पीडित आईने रायपूर पोलिस स्टेशन तक्रार दाखल दिली. विशेष म्हणजे, या नराधमास एक मुलगा, मुलगी असून मुलीचे लग्न झाले आहे. बरेच दिवसांपासून तो दारुच्या नशेत पत्नीस व आईस मारहाण करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या घटनेची माहिती गाव परिसरात पसरल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते यांनी तत्काळ आरोपीला ताब्यात घेण्याच्या सूचना ठाणेदारास दिली. मात्र तोपर्यंत तो फरार झाला होता.