केज (बीड) : पुढारी वृत्तसेवा : केज येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोव्हिड तपासणी केंद्रातील काळाबाजार एका फोटोमुळे उघडकीस आला आहे. या फोटोत रुग्णांची आरटीपीसीआर टेस्ट हा तपासणी केंद्रातील तंत्रज्ञाऐवजी चक्क एका खासगी रुग्णवाहिकेचा चालक करीत असताना दिसत आहे.
हा अत्यंत निष्काळजीपणा आणि रुग्णांच्या जिवीताशी खेळण्याचा प्रकार आहे. व्हायरल झालेल्या फोटो हा सहा दिवसापूर्वीचा असून त्या कोव्हिड तपासणी करताना दिसत आहे. तसेच येथे कोणतीही तपासणी न करताच कोरोनाची प्रमाणपत्रे देखील दिले जात असल्याची नागरिकांत चर्चा सुरू आहे. या प्रकारामुळे पुन्हा कोरोना संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
वाचा : जळगाव : धरणात पोहताना काका-पुतण्याचा बुडून मृत्यू
या तपासणी केंद्रातील कोव्हिड तपासणी करणारा कंत्राटी तंत्रज्ञ हा काम करीत नसून तो आशा प्रकारे बिगर तांत्रिक आणि खाजगी व्यक्तीकडून बेकायदेशीरपणे काम करून घेत असल्याची माहिती मिळत आहे.
वाचा :हिंगोली : मराठा आरक्षणासाठी संभाजी ब्रिगेड आक्रमक; जयंत पाटील, धनंजय मुंडेंचा ताफा अडविला
या प्रकरणी अधिक चौकशी करून जे दोषी असतील त्यांच्यावर कार्यवाही केली जाईल.
-डॉ. संजय राऊत (वैद्यकीय अधिक्षक, उपजिल्हा रुग्णालय, केज)
तपासणी केंद्रात दोन तंत्रज्ञ असून हा प्रकार जर खरा असेल त्याची अधिक माहिती घेऊ व पुढील कार्यवाही केली जाईल.
-डॉ. आसाराम चौरे (नोडल अधिकारी, कोरोना केअर सेंटर)
मला लक्षणे जाणवू लागल्याने दि.२३ जून रोजी सकाळी तपासणी करण्यासाठी केज येथील कोव्हिड तपासणी केंद्रावर गेलो. तेथील कर्मचाऱ्यांनी कोणतीही काळजी न घेता किंवा पीपीई किट आणि ग्लोज न घालता तपासणी करम्यास सुरुवात केली. परंतु, मी त्यांच्या निदर्शनास या गोष्टी आणून दिल्या त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
– प्रितम जोगदंड (नागरिक, केज)
मी जेवण्यासाठी घरी गेलो असताना ही तपासणी झाली असावी. मी ऑनकॉल पद्धतीने कंत्राटी पदावर काम करीत असून नाहक मला बदनाम करण्यासाठी असे प्रकार घडविले जात आहेत.
– मूथळे (कंत्राटी प्रयोग्यशाळा तंत्रज्ञ)