Uncategorized

India@75 : स्वातंत्र्याच्या ४० वर्षापूर्वी मादाम कामा यांनी जर्मनीत फडकावला हाेता ‘भारतीय ध्वज’

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क:   स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्‍यास देशवासीय सज्‍ज झाले आहेत. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घरावर तिरंगा फडकविण्याचे आवाहन केले आहे.तुम्हाला माहीत आहे का,  स्वातंत्र्याच्‍या ४० वर्षांपूर्वी महान स्वातंत्र्यसेनानी मादाम भिकाईजी रुस्‍तम कामा यांनी जर्मनीत  भारतीय ध्वज फडकावला होता.

१८ ऑगस्ट, १९०७ रोजी जर्मनीतील स्टुटगार्ड (जर्मनी) येथे 'आंतरराष्ट्रीय समाजवाद परिषद' भरविण्यात आली हाेती. यावेळी मादाम कामा किंवा सरदारसिंह राणा भारताचे प्रतिनिधित्त्व केले. तर वीरेंन्द्रनाथ चटोपाध्याय हे त्याचे सहकारी हाेते; पण ते याठिकाणी ब्रिटिश समादवादी नेते रैमजे मैकडोनल्च्या यांच्‍या थट्टेला त्‍यांना सामोरे जावे लागले. या परिषदेत प्रतिनिधी म्हणून स्वीकारण्यास रोषाला सामोरे जावे लागले.  फ्रेंच समाजवादी नेते ज्योरे, जर्मन नेता बेवेल लीडनेख्त आणि ब्रिटिशनेते हाइण्डमैन यांच्या समर्थनानंतर त्यांना या परिषदेत स्थान देण्यात आले, असे मन्मनाथ गुप्त यांच्या ' भारतीय क्रांतिकारी आदोलन का इतिहास" या पुस्तकात नमूद करण्‍यात आले आहे.

हा भारतीय स्वातंत्र्याचा ध्वज आहे…

याप्रसंगी मादाम कामा यांनी ज्या राष्ट्रीय ध्वजाची कल्पना केली होती. तो ध्वज स्वत:च्या हाताने बनवून सर्वासमोर फडकवला. यानंतर त्यांनी घोषणा केली की, "हा भारतीय स्वातंत्र्याचा ध्वज आहे. याचा जन्म झालेला आहे. हिंदुस्थानचे युवक, वीर आणि सुपूत्र यांच्या रक्ताने हा पवित्र झालेला आहे. इथे उपस्थित असलेल्या सर्व महान व्यक्तींना माझी विनंती आहे की, तुम्ही उभे राहून हिदुस्थानच्या या ध्वजाला वंदन करावे". यानंतर इथे उपस्थित असणाऱ्यांनी उभारून भारताच्या या ध्वजाला अभिवादन केल्याचा प्रसंगही या पुस्‍तकात नमूद करण्‍यात आला आहे.

  मादाम कामा यांनी केलेल्‍या ध्वजाची रचना

मादाम कामा यांनी भारताचा पहिला ध्वज फडकवला. त्यावर हिरवा, भगवा आणि लाल असे तीन आडवे पट्टे होते. त्याचप्रमाणे हिरव्या पट्ट्यात आठ कमळाची फुले ही भारतातील आठ राज्यांची प्रतीके होती. ध्वजाच्या मध्यभागी देवनागरी अक्षरात 'वंदे मातरम' लिहिलेले होते. यामधील शेवटच्या लाल पट्ट्यात सूर्य आणि चंद्र ही चिन्हे होती.

मादाम कामा यांचे स्वातंत्र्य चळवळीत अमूल्‍य याेगदान

श्रीमंत कुटुंबात जन्माला येऊनही त्यांनी सुरक्षित आणि आनंदी जीवनाचा त्याग केला. धाडस आणि दृढनिश्चयाच्या बळावर त्यांनी स्वत:ला साम्राज्याविरुद्धच्या लढाईत स्वत:ला वाहून घेतले. यामध्ये त्यांनी प्रामुख्याने साम्राज्यवादाच्या विरोधात जागतिक जनमत जागृत करणे आणि परकीय राजवटीपासून भारत स्वातंत्र्याची इच्छा दाव्यांसह मांडण्याचे योगदान दिले. भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी प्रदीर्घ काळ वनवास भोगला. 'वंदे मातरम' आणि 'तलवार' या वृत्तपत्रांतून त्यांनी त्यांचे क्रांतिकारी विचार मांडले.

युरोपीय समाजवादी विचाराचा मोठा प्रभाव

मादाम कामा यांचा लढा जगभरातील साम्राज्यवादाविरुद्ध होता. संपूर्ण पृथ्वीवरून साम्राज्यवादाचे वर्चस्व संपवणे हे त्‍यांचे ध्‍येय होते. मादाम कामा यांचे सहकारी त्यांना 'भारतीय क्रांतीची माता' मानत होते. कामा यांच्यावर युरोपातील समाजवादी विचाराचा मोठा प्रभाव हाेता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT