सोलापूर : पुढारी वृत्तसेवा
जनआधार फाऊंडेशन व भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 15 तर्फे 'उज्ज्वला' योजनेंतर्गत 104 महिलांना गॅस शेगडी, सिलिंडरचे वाटप करण्यात आले. आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. यावेळी संयोजक आनंद गोसकी, तुळशीदास भुतडा, प्रशांत फत्तेपूरकर, श्रीकांत कोंडा, प्रेषक इंडियन गॅसचे व्यवस्थापक लक्ष्मण सातपुते आदी
उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजयकुमार अगनूर, महेश दासी, शुभम मिठ्ठा, आकाश बुर्ला, दिनेश श्रीकोंडा, दिनेश सुरा, शाम कोटा, तुषार कामुर्ती, श्रीकांत येमुल, गणेश आंबट, बालाजी आंबट, ऋषिकेश चिलवेरी, बालाजी कुंटला, संदीप क्षीरसागर यांनी परिश्रम घेतले.