Uncategorized

शरद पवार १०० व्या अ. भा. मराठी नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष

Pudhari News

कोल्हापूर : पुढारी ऑनलईन डेस्क 

सांगली येथे २६ ते २८ मार्च दरम्यान होणाऱ्या शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष पद राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वीकारले आहे. शरद पवार यांनी ट्विटर वरून याची माहिती दिली.

शरद पवार यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे की, 'आखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी माझी भेट घेऊन यंदाच्या १०० व्या ऐतिहासिक अ. भा. मराठी नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती केली. कांबळी यांच्या विनंतीचा मी आनंदपूर्वक स्वीकार करीत आहे'.

यावर्षीचे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन २७ मार्च ते १४ जून दरम्यान पार पडणार आहे. हे १०० वे नाट्य संमेलन आहे. त्यामुळे या संमेलनाचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटणार आहेत. २७ मार्च, जागतिक रंगभूमी दिनी सांगली येथे या नाट्य संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. हे उद्घाटन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे. २८ रोजी संमेलनाचा औपचारिक दुसरा दिवस असेल याशिवाय उत्साहाला लक्षात घेऊन २९ मार्च हा आणखी एक दिवस संमेलन वाढवले जाऊ शकते.

दरम्यान २६ मार्च रोजी सांगलीत विष्णुदास भावे यांच्या गौरवार्थ नाट्य दिंडी काढण्यात येणार आहे. त्यानंतर तब्बल तीन महिन्यांनतर १४ जून रोजी मुंबईमध्ये याचा समारोप सोहळा पार पडेल. हा समारोप सोहळा चक्क आठवडाभर रंगणार आहे. महाराष्ट्रामध्ये अशाप्रकारे हा पहिला टप्पा पडेल, त्यानंतर दुसरा टप्पा संपूर्ण भारतात पार पडेल. 

या ऐतिहासिक संमेलनाच्या अध्यक्षपदी जब्बार पटेल यांची निवड करण्यात आली आहे. २५ मार्च रोजी तंजावूर, तामिळनाडू येथे जाऊन संमेलनाध्यक्ष पटेल हे सर्फोजी राजे भोसले लिखित १९ आद्य मराठी नाट्य संहितांचे पूजन करतील. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT