Ukrainian President Volodymyr Zelenskyy 
Latest

Zelenskyy car accident | युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या कारला अपघात, फेसबुक पोस्टद्वारे दिली माहिती

दीपक दि. भांदिगरे

कीव : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की (Ukrainian President Volodymyr Zelenskyy) यांच्या कारला कीव येथे अपघात झाला आहे. यात त्यांना गंभीर दुखापत झालेली नाही, असे झेलेन्स्की यांचे प्रवक्त्यानी फेसबुक पोस्टद्वारे सांगितले आहे. झेलेन्स्की युद्धग्रस्त भागात पाहणीसाठी गेले होते. या दरम्यान गुरुवारी पहाटे त्यांच्या कारला दुसऱ्या एका वाहनाने धडक दिली. (Zelenskyy car accident)
झेलेन्स्की खार्किव्ह प्रदेशातून कीवला परतत होते. यादरम्यान कीवमध्ये एक प्रवासी वाहनाने त्यांच्या कारला धडक दिली, असे त्यांचे प्रवक्ते सेर्गी निकिफोरोव्ह यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

या अपघातानंतर दुसऱ्या वाहनातील चालकावर झेलेन्स्की यांच्या वैद्यकीय पथकाने प्राथमिक उपचार केले आणि त्याला रुग्णवाहिकेने नेण्यात आले. डॉक्टरांनी झेलेन्स्की यांची तपासणी केली. त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही, असे त्यांच्या प्रवक्त्यानी म्हटले आहे. पण झेलेन्स्की यांना नेमकी काय दुखापत झालेली आहे हे त्यांनी स्पष्ट केलेले नाही. या अपघाताची चौकशी सुरु असल्याचे त्यांनी पुढे नमूद केले आहे.

कार अपघात झाल्यामुळेच (Zelenskyy car accident) झेलेन्स्की यांना जनतेला संबोधित करत असलेला रात्रीचा व्हिडिओ पोस्ट करण्यास विलंब झाला असल्याचे सांगण्यात आले आहे.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT