Latest

लंडन नाही तर स्कॉटलंडमधून होणार ब्रिटनच्या पंतप्रधानांची नियुक्ती! राणी एलिझाबेथ द्वितीय मोडणार शाही परंपरा

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : ब्रिटनच्या पंतप्रधान पदी कोण विराजमान होणार हे जवळपास झाले निश्चित आहे. जोरदार प्रचारानंतर आज शेवटच्या टप्प्यात कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे सदस्य मतदान करत आहेत. सोमवारी निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान या निवडणूक प्रक्रियेत भारतीय वंशाचे ऋषी सुनक (rishi sunak) यांच्यापेक्षा परराष्ट्र मंत्री लिझ ट्रस (liz truss) यांचे पारडे जड असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे लिझ ट्रस (liz truss) या ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान असतील असे मानले जात आहे.

सत्ताधारी कंझर्व्हेटिव्ह पक्षाकडून नव्या पंतप्रधानची निवड केल्यानंतर विद्यमान पंतप्रधान बोरिस जॉन्सन राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द करतील. बोरिस जॉन्सन यांनी जुलैमध्ये त्यांच्या सरकारची धोरणे आणि घोटाळ्यांविरोधात अनेक मंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर पंतप्रधानपदावरून पायउतार होण्याची घोषणा केली. यानंतर, ऑगस्टमध्ये त्यांच्या पक्षाच्या सुमारे 2 लाख सदस्यांनी पोस्टल आणि ऑनलाइन मतदान सुरू केले, जे आज संध्याकाळपर्यंत पूर्ण होईल. मतदानात ट्रस यांना प्रचंड पाठिंबा मिळत असल्याचे वृत्त आहे.

नवीन पंतप्रधानांना ब्रिटिश पंतप्रधानांचे निवासस्थान 10 डाउनिंग स्ट्रीटवर पोहोचल्यावर अनेक आर्थिक आणि इतर आव्हानांना सामोरे जावे लागेल. ब्रिटन सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे इंधनाचे दर गगनाला भिडले असून त्यामुळे महागाईचा दर अनेक पटींनी वाढला आहे. सर्वेक्षणानुसार, लाखो लोकांचे म्हणणे आहे की, गेल्या काही महिन्यांत दैनंदीन खर्च 80 टक्क्यांनी वाढला आहे. महागड्या इंधनामुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. लिझ ट्रस यांनी प्रचारादरम्यान कर कपातीचे आश्वासन दिले आहे, परंतु गरिबांना लाभ देणे कठीण असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. ब्रिटीश वृत्तपत्र 'द सन'नुसार, ट्रस (liz truss) यांनी या हिवाळ्यात लोकांना इंधन खर्चात दिलासा देण्याचे वचन दिले आहे. आता ते पूर्ण होईल की नाही हे येणारा काळ ठरवेल.

दरम्यान, पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असलेले ऋषी सुनक (rishi sunak) आणि त्यांचे प्रतिस्पर्धी लिस ट्रस यांनी निवडणुकीत प्रामुख्याने महागाई, गुन्हेगारी, कर आणि परराष्ट्र धोरण हे मुद्दे उपस्थित करून सभासदांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. सुनक यांनी गुरुवारी निवडणूक प्रचाराशी संबंधित शेवटच्या कार्यक्रमात मदत केल्याबद्दल त्यांचे पालक आणि पत्नी अक्षता मूर्ती यांचे आभार मानले. ते म्हणाले, 'हा शेवटचा निवडणुकीचा कार्यक्रम माझ्यासाठी खूप खास आहे कारण ज्या दोन व्यक्तींनी मला सार्वजनिक सेवेत सहभागी होण्याची प्रेरणा दिली ते माझे माझे आई आणि वडील आज इथे उपस्थित आहेत', अशी भावना व्यक्त केली.

राणी एलिझाबेथ द्वितीय स्कॉटलंडमध्ये ब्रिटनच्या नवीन पंतप्रधानांची नियुक्ती करणार आहेत. त्या लंडनला येणार नाहीत. बकिंगहॅम पॅलेसने याला दुजोरा दिला आहे. राणी एलिझाबेथ द्वितीय सध्या स्कॉटलंडमध्ये वास्तव्यास आहेत. बकिंघम पॅलेसने सांगितले की, राणी एलिझाबेथ द्वितीय स्कॉटलंडमध्ये देशाचे पंतप्रधान म्हणून ऋषी सुनक किंवा लिझ ट्रस यांच्यापैकी एकाची निवड करतील. राजेशाही परंपरेला छेद देत, 96 वर्षीय एलिझाबेथ II पुढील मंगळवारी त्यांच्या स्कॉटलंडमधील बालमोरल कॅसल निवासस्थानी कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नवनिर्वाचित नेत्याची नियुक्ती करतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT