Uddhav Thackeray 
Latest

इकडे शिंदेंनी बहुमत जिंकलं तिकडे ठाकरे ॲक्शन मोडमध्ये! उद्धव ठाकरेंनी घेतली शिवसेना भवनमध्ये बैठक

दीपक दि. भांदिगरे

मुंबई; पुढारी ऑनलाईन : शिंदे- फडणवीस सरकारने आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. दरम्यान, एक एक म्हणत शिवसनेचे ४१ आमदार शिंदे गटाला जाऊन मिळाले. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हालचाली सुरु केल्या आहेत. इकडे शिंदेंनी विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर तिकडे उद्धव ठाकरे शिवसेना भवनमध्ये दाखल झाले. शिवसेना भवनमध्ये त्यांच्या उपस्थितीत शिवसेना जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुख यांची बैठक होत आहे. या बैठकीत शिवसेनेची पुढील रणनिती काय असेल यावर चर्चा होणार समजते.

यावेळी उद्धव ठाकरे म्‍हणाले की, भाजपचा राज्‍यातून शिवसेनेला संपवण्‍याचा डाव आहे. मात्र हिंमत असेल तर त्‍यांनी मध्‍यावधी निवडणूक घेउन दाखवावी. असे खेळ खेळण्‍यापेक्षा जनतेच्‍या न्‍यायालयात आम्‍ही जावू आमचे चुकत असेल तर  चुकत असू तर जनता आम्‍हाला घरी बसवेल. सध्‍या सर्व काही घटनाबाह्य सुरु आहे. देशात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांत महाराष्‍ट्रात जे सुरु आहे त्‍याबाबत सर्वांना सत्‍य बाेलू द्‍या, विधानसभा मनमानी पद्‍धतीने चालवणे हा घटनेचा अपमान आहे, असेही यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT