Latest

दरोड्यातील दोन सराईत गुन्हेगार जेरबंद; पुणे, नगर जिल्ह्यात टाकले होते दरोडे

अमृता चौगुले

श्रीगोंदा/कर्जत: पुणे व नगर जिल्ह्यांत दरोडा, घरफोडी करणारे दोन अट्टल दरोडेखोर, श्रीगोंदा पोलिस पथकाने छापा टाकून जेरबंद केले. त्यांनी सहा गुन्ह्यांची कबुली दिली आहे. दि. 7 मे रोजी राजेंद्र श्रीमंत भोस यांच्या घराच्या दरवाजाची कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करून कपाटात ठेवलेले रोख रक्कम व सोन्याचे दागिने व चांदीच्या पट्टया चोरट्याने चोरुन नेले होते. त्याबाबत श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचा तपास चालू असताना पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना खात्रीलायक माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा सराईत गुन्हेगार किरण उर्फ सोन्या युवराज काळे (रा.बिटकेवाडी ता. कर्जत), प्रवीण शहाजी पवार (रा. धालवडी ता.कर्जत) यांनी केला आहे. त्यावरून गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचार्‍यांनी बिटकेवाडी शिवारात कॉबिंग ऑपरेशन केले. या कोंबिंग ऑपरेशन दरम्यान दोन्ही आरोपी ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडे वरील गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता, उडवाउडवीची उत्तरे दिली.

आरोपींकडे कसून चौकशी केली असता, घरफोडी केल्याची कबुली दिली. आरोपींकडून दोन्ही गुन्ह्यांत चोरीस केलेला मुद्देमाल एक लाख पंचेचाळीस हजार रुपये किंमतीचा त्यात सोन्याचे दागिने 28 ग्रॅम वजनाचे व चांदीचे दागिने 70 ग्रॅम वजनाचे असे हस्तगत करण्यात आले आहेत. आरोपींकडे कसुन चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या इतर तीन साथीदारांसह दौंड व आळेफाटा या ठिकाणी दरोडा व घरफोडीच्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. सदर गुन्हेगार हे दरोडा व घरफोडी करणारे सराईत गुन्हेगार आहेत.

आरोपी हे पोलिस कोठडीमध्ये असून, त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सदर आरोपींकडून 1 लाख 45 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई श्रीगोंदा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामराव ढिकले, पोलिस उपनिरीक्षक समीर अभंग, सहायक फोजदार अंकुश ढवळे पोना गोकळ इंगवले, पोलिस प्रकाश मांडगे, किरण बोराडे, दादासाहेब टाके, अमोल कोतकर यांनी केली आहे.

सहा गुन्हे केले उघडकीस

श्रीगोंदा पोलिस ठाण्यांतर्गत घरफोडीचे 2 गुन्हे दोंड पोलिस ठाण्यांतर्गत पुणे ग्रामीण येथील दरोड्याचे 2 गुन्हे व घरफोडीचा 1 गुन्हा उघडकीस आला आहे. आळेफाटा पोलिस ठाणे, पुणे ग्रामीण येथील घरफोडीचा 1 गुन्हा असे एकूण 6 गुन्हे उघडकीस आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT