Latest

विकृतीचा कळस! दोघांनी चितेवर जळत असलेले खाल्ले मानवी मांस

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन डेस्क : ओडिशातील मयूरभंजमधून एक घृणास्पद कृत्य केल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. स्मशानभूमीत जळत्या चितेवर अर्ध्या जळलेल्या शरीराचे मांस खाल्ल्याचा आरोप दोन मद्यधुंद व्यक्तींवर करण्यात आला आहे. मयूरभंज जिल्ह्यातील बादसाही ब्लॉकमधील दंतुनीबिंधा गावात गावकऱ्यांनी 25 वर्षीय मुलीचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत आणला होता. त्या मुलीचा मृत्यू दीर्घ आजाराने झाला होता.

त्यांची मुलगी आजारी असल्याने त्यांनी तिला उपचारासाठी बारीपाडा येथील एमसीएच हॉस्पिटलमध्ये आणले. मात्र, तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर महिलेचा मृतदेह गावातील स्मशानभूमीत आणून अग्नी दिला. त्यानंतर मध्यधुंद व्यक्तीने अचानक जळत्या चितेतून मांसाचा एक भाग बाहेर काढला आणि त्याचे तीन तुकडे केले. त्यानंतर त्याने मांसाचे दोन तुकडे आगीत टाकले आणि उरलेला एक तुकडा दुसऱ्या व्यक्तीला खाण्यास दिला. या घटनेची माहिती गावकऱ्यांना मिळाल्यानंतर दोन्ही आरोपींना स्थानिक नागरिंकाकडून बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर दोघांना खांबाला बांधून ठेवले. गावकऱ्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती देऊन दोघांनाही पोलिसांच्या ताब्यात दिले.

मृताच्या नातेवाईकाने सांगितले की, या दोन्ही आरोपींच्या लक्षात आले की शरीराचा काही भाग पूर्णपणे जळालेला नाही. नंतर त्यांनी मांसाचे काही तुकडे उचलले आणि खाल्ले तसेच बाकीचे पुन्हा चितेत टाकले असा दावा त्यांनी केला. या कृत्यामुळे दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आल्याचे बादशाही पोलिस स्टेशनचे आयआयसी संजय कुमार परिदा यांनी सांगितले. दारूच्या नशेत त्याने हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेतील एक आरोपी सुंदर मोहन सिंग हा तांत्रिक आहे. दारूच्या नशेत त्याने हे कृत्य केले आहे. अशी गुन्ह्याची कबुली त्या व्यक्तीने दिली. अधिक तपास बादशाही पोलिस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT