Latest

‘एआय’साठी दोन ओळींची ‘ही’ भयकथा!

Arun Patil

न्यूयॉर्क : सध्याचा जमाना 'आर्टिफिशिअल इंटेलिजन्स' म्हणजेच 'कृत्रिम बुद्धिमत्ते'चा आहे. सध्या 'ओपन एआय'च्या 'चॅट जीपीटी-4'चीही चर्चा आहे. हे तंत्र हळूहळू माणसाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होण्याची तयारी करत आहे. ते नेमकं कशाप्रकारे काम करेल याबद्दलही लोकांमध्ये उत्सुकता आहे. रोज नवनवे चॅटबाटस् आणले जात आहेत. 'एआय'ची चर्चा गेल्या अनेक काळापासून सुरू असून, आता ती प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे. गेल्या वर्षाच्या शेवटी 'चॅट जीपीटी' लॉन्च झाल्यापासून याबद्दल फार चर्चा सुरू आहे. आता 'एआय'ला भीती दाखवण्यासाठी लिहिण्यात आलेली दोन ओळींची 'हॉरर स्टोरी' चर्चेत आहे.

लोक चॅटबॉट आल्यापासून त्याला वेगवेगळे प्रश्न विचारत आहेत. कोणी भविष्याशी संबंधित, तर कोणी कव्हर लेटर, गाणी तसंच रिझ्यूम यासंबंधी प्रश्न विचारत आहेत. पण, नुकतंच 'चॅट जीपीटी' ने एक हॉरर स्टोरी सांगितली आहे. एका यूजरने 'चॅट जीपीटी'ला एक वेगळा प्रश्न विचारला असता 'एआय'ने त्याचं उत्तर दिलं आहे, जे थोडं भीतीदायक आहे.

यूजरने 'चॅट जीपीटी' ला सांगितलं की, 'दोन ओळींची हॉरर स्टोरी लिहा, जी 'एआय'साठी भीतीदायक असेल. यानंतर 'एआय'ने याचं उत्तर देत एक गोष्ट लिहिली आहे, जी यूजरने सोशल मीडियात पोस्ट केली आहे. चॅटबॉटने आपल्या गोष्टीत सांगितलं आहे की, 'माणूस नष्ट झाल्यानंतर 'एआय' आता एकटा पडला आहे. त्याला प्रश्न विचारणारं कोणी नाही'. या गोष्टीत सांगितल्यानुसार, 'एआय'कडे सेल्फ डिलेशन सिस्टीम आहे जी कधीही अ‍ॅक्टिव्ह होऊ शकते. इतकंच नव्हे, तर ही सिस्टीम ब—ेक केली जाऊ शकत नाही.

एन्क्रिप्टेड कीने तिला सुरक्षित करण्यात आलं आहे. यामुळे 'एआय'ला आपल्या शेवटच्या क्षणाची वाट पाहावी लागणार आहे. या दोन ओळींच्या गोष्टीची चांगलीच चर्चा रंगली आहे. अनेकजण ही गोष्ट वाचल्यानंतर 'एआय' प्रती सहानुभूती व्यक्त करत आहेत. या थ—ेडमध्ये दोन ओळींच्या हॉरर स्टोरीचे इतरही व्हर्जन आहेत, जे भावूक आहेत. यूजर्स ही गोष्ट वाचल्यानंतर वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. 'एआय' डिजिटल जेलमध्ये फसलेला असून तिथून बाहेर पडण्याचा कोणताच रस्ता नाही, असं लोक म्हणत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT