पुणे : पुढारी वृत्तसेवा : देश विघातक कृत्याच्या संशयातून पुणे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांचा एक साथीदार फरार झाला आहे. राजस्थानमधील एनआएच्या एका गुन्ह्यात हे आरोपी फरार होते. त्यांच्यावर पाच लाखाचे बक्षीस देखील ठेवण्यात आले होते. इम्रान खान आणि मो. युनूस साकी अशी दोघांची नावे आहेत.
मंगळवारी पहाटे अडीच वाजताच्या सुमारास कोथरूड पोलिस पेट्रोलिंग पथकातील प्रदीप चव्हाण आणि अमोल नाझन यांनी तिघे संशयित दुचाकी चोरांना पकडले. जेव्हा त्यांना घराच्या झडतीसाठी नेले तेव्हा त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी दोघांना पकडले. त्यानंतरच्या घराच्या झडतीत एक जिवंत राऊंड , 4 मोबाईल आणि लॅपटॉप जप्त करण्यात आला. गेल्या दीड वर्षापासून ते पुण्यात वास्तव्याला असल्याचे समोर आले आहे.
मागील वर्षापासून होते फरार
राजस्थानच्या जयपूर शहरात बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या तयारीत असलेलता सुफा या आतंकवादी टोळीशी संबंधित असलेल्या दोघांना पुणे पोलिसांनी पकडले आहे. 30 मार्च 2022 रोजी राजस्थान पोलिसांनी एका कारमधून स्फोटके घेऊन जाताना अल्तमस पुत्र बशीर खां शेरानी याला पकडले होते. त्यानंतर हा प्रकार समोर आला होता. राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआए) ने या संदर्भात गुन्हा दाखल करून अनेकांना अटक केली होती. मात्र तेव्हापासून युनूस साकी, इमरान आणि फिरोज पठान हे तिघे फरार होते. आइएसआइएस पासून प्रेरणा घेऊन ही संघटना काम करते.
हे ही वाचा :