Latest

Kuno National Park | कुनोमधील मोठ्या अधिवासात चित्ते रमले: २४ तासांच्या आत केली पहिली शिकार

दीपक दि. भांदिगरे

कुनो : कुनो नॅशनल पार्कमधील (Kuno National Park) एका मोठ्या परिसरात सोडल्याच्या २४ तासांच्या आत दोन चित्त्यांनी पहिली शिकार केली असल्याची माहिती विभागीय वन अधिकारी (डीएफओ) प्रकाश कुमार वर्मा यांनी दिली आहे. नामिबियातून आणलेले आठ चित्ते १७ सप्टेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडले होते. या आठ चित्त्यांपैकी पाच मादी आणि तीन नर चित्ता आहेत. यातील दोन चित्त्यांना शनिवारी एका मोठ्या परिसरात सोडण्यात आले होते. या चित्त्यांना ५० दिवसांपासून क्वारंटाईन करण्यात आले होते. उर्वरित चित्त्यांना एक, दोन दिवसांत मोठ्या परिसरात सोडले जाणार आहे.

वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रविवारी संध्याकाळी ६ ते सोमवारी सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान चित्त्यांनी हरणाची शिकार केली आहे. फ्रेडी आणि एल्टन या चित्याच्या पहिल्या जोडीला ५ नोव्हेंबर रोजी मोठ्या परिसरात सोडण्यात आले. चित्त्यांनी २४ तासांच्या आत पहिली शिकार करणे अपेक्षेपेक्षा चांगले आहे. यावरुन सूचित होते दोन्ही चित्ते पूर्णपणे तंदुरुस्त आहेत आणि क्वारंटाईनमध्ये राहिल्यामुळे चित्त्यांच्या स्नायूंची ताकद कमी झाल्याची चिंता निराधार असल्याचे वन विभागातील अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. चित्त्यांची आणखी एक जोडी मोठ्या परिसरात सोडण्यापूर्वी चित्त्यांच्या जोडीवर वन अधिकारी सॅटेलाइट कॉलर आणि कॅमेरेच्या साहाय्याने सुमारे दोन दिवस देखरेख ठेवणार आहेत.

वन अधिकारी आशा या मादी चित्ताचे निरीक्षण करत आहेत, जी गर्भवती असल्याची शक्यता वर्तवली जात होती. तिला १० नोव्हेंबरनंतर मोठ्या परिसरात सोडण्यात येणार आहे.

१७ सप्टेंबर रोजी नामिबियातून  मध्य प्रदेशमधील कुनो नॅशनल पार्कमध्ये (Kuno National Park) आठ चित्ते आणले होते. यामध्ये पाच मादी आणि तीन नर आहेत. विशेष बोईंग ७४७-४०० विमानानं या चित्यांना नामिबियातून ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) येथे आणण्यात आले होते. ग्वाल्हेरहून त्यांना हेलिकॉप्टरने कुनो नॅशनल पार्कमध्ये आणलं होतं. सलग २० तासांत ८ हजार किलोमीटरचा प्रवास या चित्यांनी केला होता. या चित्यांसोबत नामिबियाच्या चित्ता संवर्धन विभागाचं (CCF) एक पथक होतं. मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये (KNP-केएनपी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त कुनो पार्कमध्ये या चित्त्यांना सोडले होते.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT