आनंद महिंद्रा (संग्रहित छायाचित्र ) 
Latest

Anand Mahindra qualification : आनंद महिंद्रांना नेटकर्‍याने विचारलं, तुमचं शिक्षण किती? ; उत्तराने सर्वांची मने जिंकली

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :
देशातील ख्‍यातनाम उद्योगपती आनंद महिंद्रा आपल्‍या ट्विटरवरील पोस्‍टमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. आपल्‍या फॉलोअर्ससाठी ते काही विनोदी तर प्रेरणादायी संदेश शेअर करतात. सोमवारी त्‍यांनी एका पाेस्‍टवर कमेंट केली.  यावेळी एका युजरने त्‍यांना त्‍यांचे शिक्षण विचारले. ( Anand Mahindra qualification ) यावेळी त्‍यांनी समर्पक उत्तर देत सर्वांचीच मने जिंकली.

त्‍याचं असं झालं की, उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी सोमवारी एका ट्विटर पोस्‍ट केली. ही पोस्‍ट होती पुस्‍तक वाचनात तल्‍लीन झालेल्‍या एका मुलीची. ट्विटर युजर अभिषेक दुबे याने हा फाेटाे शेअर केला होता. याबाबत त्‍यांनी म्‍हटलं होती, "आज हिमाचलच्‍या यात्रेवर होतो. येथे एक लहान मुलगी एकटी बसून नोट्‍स वाचताना पाहून आश्‍चर्य वाटले. पुस्‍तक वाचताना तिची एकाग्रता पाहून आश्‍चर्य वाटले. मी याचे शब्‍दात वर्णन करु शकत नाही. शानदार". या फोटोचा प्रभाव आनंद महिंद्र यांच्‍यावरही पडला. त्‍यांनी आपल्‍या पोस्‍टमध्‍ये म्‍हटलं की, " सुंदर फोटो, अभिषेक, ही माझी #MondayMotivation आहे".

आनंद महिंद्रा यांची पोस्‍ट प्रचंड वेगाने व्‍हायरल झाली. अनेकांनी वाचण्‍यात तल्‍लीन झालेल्‍या मुलीचा फोटो प्रेरणादायक असल्‍याचे म्‍हटलं. तर यावेळी युजर विभग एसडी याने महिंद्रा यांना प्रश्‍न केला की, "सर, तुमचे शिक्षण किती झाले आहे? याची मला माहिती मिळू शकेल का?". यावर आनंद महिंद्रा यांनी दिलेल्‍या असे उत्तर दिले की, त्‍यांनी सर्वांची मने जिंकली.

Anand Mahindra qualification : खरं सांगू का, मी ज्‍या वयात आहे…

तुमचं शिक्षण किती झाले आहे? या प्रश्‍नावर आनंद महिंद्रा यांनी उत्तर दिले की, "खरं सांगू का, मी ज्‍या वयात आहे त्‍यामध्‍ये कोणत्‍याही पदवीपेक्षा सर्वात्‍कृष्‍ट पदवी हे अनुभव आहे". त्‍यांचे हे उत्तर सर्वांनाच भावले. काही तासांमध्‍ये महिंद्रा यांच्‍या पोस्‍टला ३,८०० पेक्षा अधिक लाईक्‍स मिळाल्‍या. तर १०० पेक्षा अधिक जणांनी ही पोस्‍ट रीट्विट केली.

आनंद महिंद्र यांच्‍या पोस्‍टवर एका युजरने म्‍हटलं की, अनुभव हा कोणत्‍याही पदवीपेक्षा मोठा आहे. तर दुसर्‍याने म्‍हटलं की, अनुभव अमूल्‍य आहे. तो आजकालच्‍या पदवी प्रमाणे एक वस्‍तू नाही. सर, खरंच तुम्‍ही दिलेले उत्तर हे सर्वार्थाने परिपूर्ण आहे. सर, योग्‍यतेपेक्षाही उद्‍योगामध्‍ये अनुभव हा महत्त्‍वाचा ठरतो, असेही एका युजरने आपल्‍या प्रतिक्रियेमध्‍ये नमूद केले आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT