Latest

Shubhangi Atre | ‘भाभी जी घर पर हैं’! फेम अभिनेत्रीचा १९ वर्षाचा संसार मोडला, नाते तुटल्याने झाली भावूक

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'भाभी जी घर पर हैं'! फेम टीव्ही अभिनेत्री शुभांगी अत्रे (Shubhangi Atre) आणि तिचा पती पियूष पुरी (Piyush Poorey) यांचा १९ वर्षाचा संसार संपुष्टात आला आहे. दोघे एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. हे दोघे सुमारे एक वर्षापासून एकत्र राहत नाहीत आणि ते पुन्हा एकत्र येण्याची शक्यता नाही. याबाबतचे वृत्त द टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे. शुभांगीने २००३ मध्ये तिचे मूळ ठिकाण इंदूरमध्ये पियूषसोबत लग्न केले होते. दोन वर्षांनंतर त्यांना मुलगी झाली होती. पियूष डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात काम करत होता.

'भाभी जी घर पर हैं'! (Bhabiji Ghar Par Hai) या टीव्ही शोमध्ये अंगूरी भाभीची भूमिका करणाऱ्या शुभांगीने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील या गोष्टीबाबत खुलासा केला आहे. तिने म्हटले आहे की "आम्ही जवळपास एक ‍वर्षापासून एकत्र राहत नाही. मी आणि पियूषने आमचा संसार वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. एकमेकांप्रती आदर, विश्वास आणि मैत्री हा मजबूत वैवाहिक जीवनाचा पाया आहे. पण आम्ही आमच्यामधील मतभेद मिटवू शकत नाही. यामुळे आम्ही एकमेकांना वेळ देण्याचे ठरवले असून आमच्या वैयक्तिक जीवनावर आणि करिअरवर लक्ष केंद्रित केले आहे."

दोघे वेगळे होण्याचा निर्णय घेणे सोपे नव्हते, असे सांगत तिने पुढे म्हटले आहे की अजूनही अवघड वाटत आहे. माझे कुटुंब हे माझ्यासाठी सर्वोच्च प्राधान्य आहे आणि आम्हाला सर्वांना वाटते की आपले कुटुंब आपल्यासोबत असावे. पण काही नुकसान हे दुरूस्तीच्या पलीकडचे आहे. जेव्हा इतक्या वर्षांचे नाते तुटते, तेव्हा त्याचा तुमच्यावर मानसिक आणि भावनिक परिणाम होतो. माझ्यावरही परिणाम झाला आहे, पण आम्हाला हे पाऊल उचलावे लागले आणि मी ते स्वीकारले आहे. मानसिक स्थिरता हवी. माझा नेहमीच विश्वास आहे की संकटे तुम्हाला खूप काही शिकवतात.

"आम्हाला १८ वर्षाची मुलगी आहे. पियूष रविवारी तिला भेटायला येतो. तिला तिच्या वडिलांचे प्रेम मिळायला हवे. तिला वडिलांपासून दूर करु शकत नाही, असे मला वाटते," असे शुभांगीने पुढे म्हटले आहे.

शुंभागीने (Shubhangi Atre) २००६ मध्ये तिच्या टीव्ही करिअरची सुरुवात 'कसौटी जिंदगी की'मधून केली होती. तिने कस्तुरी आणि चिडिया घर सारख्या शोमध्ये काम केले आहे.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT