पुढारी ऑनलाईन डेस्क : शक्तीशाली भूकंपाचा तडाखा बसलेले तुर्कस्तान आणि सीरियात अद्याप हजारो नागरिक ढिगार्याखाली अडकले आहेत. २४ तासानंतरही मृतदेह मिळत असून युद्धपातळीवर मदतकार्य सुरु आहे. गंभीर जखमींना हवाई दलाच्या मदतीने उपचारासाठी अन्यत्र हलवले जात आहे. दरम्याम तुर्कीतील सानलिउर्फा प्रांतात तब्बल २२ तासानंतर ढिगार्याखाली सापडलेल्या महिलेची सुटका करण्यात आली.
तुर्कस्तानमधील १० हून अधिक प्रांतांना शक्तीशाली भूकंपाचा तडाखा बसला आहे. येथील ६२१७ हून अधिक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. सीरियातील अलेप्पो शहर उद्ध्वस्त झाल्याची माहिती सीरियातील सरकारी वृत्तसंस्था SANA ने दिली आहे. संयुक्त राष्ट्राचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर पश्चिम सीरियामध्ये २२४ इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. तर ३२५ हून अधिक इमारतीची पडझड झाली आहे.