Latest

Trimbakeshwar Shiva Temple | गुढी पाडव्याला त्र्यंबकराजाची सुवर्ण मुखवटयासह पुजा

गणेश सोनवणे

ञ्यंबकेश्वर (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा- शतकांची परंपरा जोपासत असलेली त्र्यंबक नगरी आणि त्र्यंबकराजाच्या मंदिरात नववर्षाच्या प्रारंभी पेशवेकालीन परंपरेने सायंकाळी होणारी प्रदोष पुष्प शृंगार पुजा पंचमुखी सुवर्ण मुखवटयासह करण्यात आली. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ञ्यंबकेश्वर मंदिरात गुढी पाडव्यास पंचमुखी सुवर्ण मुखवटयाची मंगलवाद्यांसह पारंपारिक पद्धतीने पालखी निघाली. वर्षभरात केवळ दोन वेळा व अडीच तास अशा प्रकारचे दर्शन भाविकांना घडत असते. (Trimbakeshwar Shiva Temple)

पालखीच्या सोबत देवस्थान ट्रस्ट चेअरमन न्या.नितीन जीवने सप्त्नीक उपस्थित राहीले. त्यासह विश्वस्त कैलास घुले, सत्य`िपय शुक्ल, मनोज थेटे, पुरूषोत्तम कडलग, प्रशासकीय अधिकारी समीर वैद्य, अमित माचवे, ओमकार आंबेकर, प्रणव जोशी ,निलेश कपुर ,विजय गंगापुत्र यासह पुजारी राज तुंगार, श्रीपाद देशमुख, शागिर्द मंगेश दिघे, अनंत दिघे, अजिंक्य जोशी उपस्थित होते. मंदिर सभामंडपात सुवर्ण मुखवटा नेण्यात आला. गर्भगृहात  नित्य प्रदोष पुष्प पूजक आराधी यांची पुजा सुरू होती. नित्य प्रदोष पुजक डॉ. ओमकार आराधी, अॅड शुभम आराधी आणि उल्हास आराधी यांनी सुवर्ण मुखवटा शिवपिंडीवर विराजमान केला. दरम्यान नित्यपुजेतील चांदीचा मुखवटा हर्ष महालात नेण्यात आला. यावेळेस चेअरमनसह सर्व विश्वस्तांनी दर्शन घेतले. ञ्यंबकराजाला भरजरी पोषाख करण्यात आला होता. त्यास पुरणपोळी, श्रीखंड यासह पंचपक्वांनाचा महानैवद्य अपर्ण करण्यात आला. माजी नगरसेविका मंगला आराधी, डॉ.स्नेहल आराधी  यांनी नैवद्य तयार केला. दरम्यान यावेळेस ञ्यंबकराजाची आरती करण्यात आली. भक्तांनी या अलौकिक दर्शनाचा लाभ घेतला. सायंकाळी 7.30 वाजता ञ्यंबकेश्वरचा पंचमुखी सुवर्ण मुखवटा पालखीतून कोठी इमारतीत नेण्यात आला. नागरिकांनी सायंकाळी दर्शनासाठी मंदिरात गर्दी केली होती. (Trimbakeshwar Shiva Temple)

साडे आठ किलो वजनाचा सुवर्ण मुखवटा (Trimbakeshwar Shiva Temple)

ञ्यंबकराजाचा पेशवेकालीन असलेला पंचमुखी सुवर्ण मुखवटा साडे आठ किलो वजनाचा आहे. दर सोमवारी हा मुखवटा पालखीतून कुशावर्तावर स्नानासाठी नेतात. ञ्यंबकराजाची नित्य पुजा झाल्यानंतर शिवपिंडीवर चांदीचा मुखवटा ठेवण्यात येतो. मात्र गुढी पाडवा आणि दिवाळी पाडवा या दोन वेळेस सायंकाळच्या प्रदोष पुजेत देवाचा शृंगार करून, भरजरी पोषाख करून त्यावर पंचमुखी सुवर्ण मुखवटा ठेवतात. हे वर्षातून केवळ दोन वेळेस सायंकाळी पाच ते साडे सात वाजे पर्यंत मिळणारे दुर्मीळ दर्शन आहे. नागरिक यासाठी मंदिरात दर्शनासाठी गर्दी करतात.

हेही वाचा –

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT