Latest

व्हायरल व्हिडीओ : सायकल ‘विमानावर’ नेटकरी म्‍हणाले, “एवढ्या मेहनतीची…”

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन :  उडती सायकल हवेत झेपावतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ मोहम्मद जमशेद नावाच्या एका यूजर्सने ट्विटरवरून पुन्हा शेअर केला आहे. यामध्‍ये एक व्यक्ती सायकलीचे पायडेंल मारत उडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. जो एका बॉक्समध्ये दिसत आहे, सायलच्‍या दोन्ही बाजूला विमानासारखे पंख लावले आहेत.

जमशेद याने ही पोस्ट ट्विटरवर शेअर करताना लिहलं आहे, "या लोकांनी सायकल चालवतानाच विमान उडविण्याचा प्रयत्न केला आहे. मल्टी टास्किंगवर बोला. तसेच त्याने #crazy #aviation हे दोन हॅशटॅगही वापरले आहेत. शेअर केलेल्या या व्हिडिओच्या लहान क्लिपमध्ये विमानासारख्या पंखांनी बनवलेले पारदर्शक चौकोनी आच्छादन आणि आत सायकल चालवणारा एक व्यक्ती आहे.

यामध्ये आतील सायकलस्वार वेग वाढवत असताना एक व्यक्ती तात्पुरत्या विमान वाहतूक यंत्रासह धावतानाही दिसतो. काही सेकंदांनंतर, मशीन सायकलिंगद्वारे तयार केलेल्या उर्जेच्या मदतीने टेक ऑफ करताना दिसते आणि जमिनीवर आदळण्यापूर्वी काही काळ हवेत राहते.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT