गिझा : इटलीतील ग्रेट पिरॅमिडमधील एका गुप्त जागेचे रहस्य उलगडण्यासाठी संशोधक बरेच झटत आहेत. या जागी प्राचीन काळातील राजेशाहीच्या पाऊलखुणा जपणारा मोठा खजिना असू शकतो, असा या संशोधकांचा कयास आहे.
ग्रेट पिरॅमिडमधील ही अत्यंत गुप्त जागा 2017 च्या आसपास शोधण्यात आली. मात्र, यानंतरही अद्याप याचे पूर्ण रहस्य उलगडलेले नाही, ही वस्तुस्थिती आहे. संशोधक आता याचा उलगडा करण्यासाठी स्कॅनिंग टेक्नॉलॉजीचा उपयोग करत आहेत. पिरॅमिडच्या आत नेमके काय आहे, हे लवकरच सुस्पष्ट होईल, अशी त्यांना आशा आहे.
प्रारंभी या पिरॅमिडमधील तळघर जितके असावे, असे वाटत होते, त्यापेक्षा ते 10 मीटरने अधिक मोठे असल्याचे आढळून आले. त्याची लांबी 40 मीटरच्या आसपास असल्याचे संकेत मिळाले. पुरातत्त्वाचा अभ्यास करणारे पॉडकास्ट आर्किटेक्ट के. मॅथ्यू सिब्सन यांनी या तळघरात बहुमूल्य शाही व धार्मिक वस्तू एकत्रित असल्याचा अंदाज व्यक्त केला. काहींच्या मते, ही जागा प्राचीन राजांचे अंतिम विश्रांतीस्थान असण्याची शक्यता आहे तर येथे मोठा खजिना असावा, असा काहींचा कयास आहे.