महिला अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. रात्री उशिरा घरी जाणाऱ्या अनेक महिलांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. वर्दळीच्या ठिकाणचा प्रवास असो किंवा आडरस्त्याचा. रात्री प्रवास करणारी कोणतीही स्त्री मनातून धास्तावलेलीच असते. विशेषत: पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास करताना ड्रायव्हर, सहप्रवासी यांच्याकडून त्रास दिला गेल्याच्या अनेक घटना समोर येताना दिसतात. मोठ्या शहरात रात्री उशिरा प्रवास करताना तुलनेने सुरक्षित माध्यम म्हणून कॅबने प्रवास करण्याला प्राधान्य दिले जाते. जर तुम्ही उबर या अॅपची मदत घेत असाल तर सेटिंगमध्ये काही बदल करून प्रवास काही अंशी सुरक्षित करू शकता.
पण अनेकदा या कॅब प्रवासतही सुरक्षिततेची हमी दिली जात नाही. दरवेळी पेपर स्प्रे, सेल्फ डिफेन्स अशा गोष्टी ऐनवेळी कामाला येतीलच असे नाही. अनेकदा तंत्रज्ञानाची मदत घेऊनही आपण अचानक समोर ठाकलेल्या प्रसंगातून स्वत:ची सुटका करून घेऊ शकतो. तुम्हीही रात्री उशिरा कॅबने प्रवास करत असाल तर या छोट्या छोट्या टिप्समुळे तुमचा प्रवास अधिक सुखकर होण्यास प्राधान्य मिळेल.
अॅपच्या सेटिंग्ज या ऑप्शनमध्ये जा.
तेथील सेफ्टी प्रेफ्रंसेस हा पर्याय निवडा.
यातील
get more safety check ins
record audio
share trip status
हे तीन पर्याय निवडा.
यानंतरAll ride या पर्यायावर क्लिक करा.
आता तुम्ही जेव्हा कॅबने प्रवास कराल तेव्हा या दरम्यान कॅब कोणत्याही अनोळखी वाटेने जाऊ लागली तर अॅप तुमच्या लोकेशनवर लक्ष ठेवेल.
याशिवाय प्रत्येक राइड दरम्यानचा ऑडिओ ही रेकॉर्ड केला जाईल.
तिसऱ्या ऑप्शनच्या माध्यमातून तुम्ही लोकेशन ट्रॅकिंग जिवलगांशी शेअर करू शकता.
याशिवाय या अॅपमधून 100 डायल करता येणं शक्य आहे. जेणेकरून ड्रायवरची सगळी माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली जाईल.