धायरी : पुढारी वृत्तसेवा : मुंबई बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर वडगाव बुद्रुक येथील मुठा नदी पुल परिसरात रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहतुक व्यवस्था ठप्प झालेली आहे. नदी पुलापासून नवीन कात्रज बोगद्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. यामुळे वाहन चालक, नागरिक, कामगार, विद्यार्थी हैराण झाले आहेत. वडगाव, धायरी, नऱ्हे,आंबेगाव परिसरातील सर्व सेवा रस्ते वाहतूककोंडी मुळे ठप्प झाले आहेत.
नदी पुलावर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतुक व्यवस्था कोलमडली आहे. वारजे, सिंहगड, भारती विद्यापीठ पोलिसांच्या वतीने वाहतुक सुरळीत करण्याचे प्रयत्न करीत आहेत. याबाबत महामार्ग प्रशासनाला कळवून सुद्धा कोणतीही दखल घेत नाहीत. –
-पांडुरंग वाघमारे (सहाय्यक पोलीस निरीक्षक सिंहगड वाहतुक शाखा )
याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना कळवून सुद्धा कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्वरित रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यात यावेत. अन्यथा नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.
-सारंग नवले (सरचिटणीस भाजपा )