पुढारी ऑनलाईन डेस्क : Tokyo Olympics Day 3 Live : ऑलिम्पिकमध्ये आज तिसऱ्या दिवशी पदक मिळविण्यासाठी भारताचे अनेक स्टार खेळाडू आपले नशीब आजमावतील.
रविवारी मनु भाकर, पीव्ही सिंधू, सानिया मिर्झा आणि एमसी मेरी कोम सारख्या स्टार खेळाडू भारताच्या पदकांच्या आशा पूर्ण करण्यासाठी उतरतील.
आजच्या सामन्यात भारतीय खेळाडू बॅडमिंटन, हॉकी, बॉक्सिंग, नेमबाजी, टेबल टेनिस, टेनिस आणि जलतरण स्पर्धेत भारताच्या वतीने स्पर्धा करणार आहेत.
तिसर्या दिवशी भारतासाठी पहिल्या स्पर्धेत 10 मीटर एअर पिट्स मनु भाकर आणि यशस्विनी देसवाल अंतिम फेरी गाठू शकले नाहीत. मनु भाकर आणि देसवाल दोघांनाही अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवता आली नाही.
हॉकीमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा पूल ए च्या दुसऱ्या सामन्यात ७ – १ असा पराभव केला. भारताकडून दिलप्रीत सिंगने एकमेव गोल केला. दोन्ही संघांनी आपापले पहिले सामने जिंकले आहेत. दोन्ही संघ ग्रुपमध्ये टॉपवर राहण्याचा प्रयत्न करत आहेत. भारताचा पुढचा सामना मंगळवारी स्पेनबरोबर होणार आहे.
भारताची सर्वोत्कृष्ट बॉक्सर मेरी कोमने विजयासह सुरुवात केली. अनुभवी मेरी कोमने प्रतिस्पर्ध्याला सहज पराभूत करून हा सामना जिंकला. मेरी कोमने या विजयासह पुढील फेरी गाठली. मेरी कोम तिची शेवटची ऑलिम्पिक खेळत आहे. ५१ किलो वजनी फ्लायवेट प्रकारात सहावेळा विश्वविजेत्या एमसी मेरी कोमने रिपब्लिक ऑफ रिपब्लिकच्या मिगुएलिना हर्नांडेझ गार्सियाला ४-१ ने पराभूत केले.
पीव्ही सिंधूने विजयी सलामी देत शानदार सुरुवात केली आहे. सिंधूने अवघ्या 28 मिनिटांत इस्राईलच्या सेनियाचा 21-7, 21-10 अशा गेममध्ये पराभव करून विजय प्राप्त केला. ती पुढील फेरीतील सामना मंगळवारी होईल. टेनिस महिला दुहेरीमध्ये सानिया मिर्झा आणि अंकिता रैनाची लढत सुरु आहे.