मेष ः मित्राबाबत गैरसमज झाल्याने अनवस्था प्रसंग, नको ती प्रतिक्रिया उमटू शकेल. म्हणून कोणताही निर्णय जाहीर करण्याआधी संतुलित विचार करा.
वृषभ ःआपल्या पत्नीच्या सफलतेचे कौतुक करा, तिच्या यशाने आनंदी व्हा आणि उज्ज्वल भविष्याची कामना करा. घरातील वातावरण आनंदी बनेल.
मिथुन ः काहीतरी असे करा ज्यामुळे तुमची मिळकत क्षमता वाढू शकेल. कुटुंबीयांसमवेत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या. मनोबल उंचावेल.
कर्क ः स्पर्धेमुळे तुमचे कामाचे वेळापत्रक धकाधकीचे, धावपळीचे बनेल. आपल्या वेळेची किंमत समजा. कोणताही निर्णय घेताना विचार करा.
सिंह ः वैयक्तिक प्रश्न मानसिक आनंद हिरावून घेतील. परंतु आवडीचे वाचन करण्यासारखे मानसिक उपाय कराल तर ताणतणावाशी सामना करू शकाल.
कन्या ः कुटुंबातील लोकांसोबत वेळ घालवू शकता. दिवसा झालेल्या वादविवादानंतर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत संध्याकाळ मात्र चांगली घालवाल.
तूळ ः कुटुंबातील काही सदस्यांच्या मत्सरी वागणुकीमुळे त्रासून जाल. परंतु, तुमचा राग अनावर होऊ देऊ नका. अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकेल.
वृश्चिक ःआजच्या दिवशी चार भिंतीबाहेरची रम्य भटकंती, मेजवान्या तुमचा मूड चांगला ठेवतील. मित्रांच्या मदतीमुळे आर्थिक अडचण सुकर होईल.
धनु ःकोणताही निर्णय घेताना विचार करा. अन्यथा त्याचा तुम्हाला त्रास होईल. मुलांच्याबाबत काळजी वाटेल. आर्थिक व्यवहार सुकर होतील.
मकर ः आरोग्याची काळजी घेणे गरजेचे. दुसर्यांच्या शब्दावर विसंबून गुंतवणूक केली तर आज आर्थिक तोटा होण्याची शक्यता आहे.
कुंभ ः कलात्मक छंद तुम्हाला आराम मिळवून देतील. धन तुमच्या हातात टिकणार नाही. धन संचय करण्यात आज खूप समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
मीन ः आज कार्य क्षेत्रात तुमच्या कुणी जुन्या कामाचे कौतुक होऊ शकते. तुमच्या कामाला पाहून आज तुमचे कौतुक आणि प्रगती होण्याची शक्यता आहे.