आजचं राशिभविष्य (दि.९ नोव्हेंबर २०२२)
मेष : आरोग्य उत्तम राहील. आजूबाजूला उत्साह वाढविणाऱ्या घटना घडतील. पारिवारिक सौख्य लाभेल. शुभ दिवस.
वृषभ : नोकरीत चांगली परिस्थिती राहील. तुमच्या कर्तबगारीला वाव मिळेल. एखादे महत्त्वाचे काम हातावेगळे करू शकाल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
मिथुन : आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. मित्रमंडळींच्या वर्तुळातून चांगले सहकार्य मिळेल. मनासारख्या घटना घडतील.
कर्क : कुटुंबातील सर्वांचे सहकार्य लाभेल, विशेषतः जीवनसाथीबरोबर असलेले संबंध जास्त प्रेमळ होतील. मुलांकडून शुभवार्ता मिळतील.
सिंह : मानसन्मानाचे योग येतील. मनोबल वाढविणाऱ्या घटना घडतील. काही महत्त्वाच्या बाबतीत निर्णय धाडसाने घ्यावे लागतील.
कन्या : महत्त्वाच्या कामात अडथळे येऊन कामे लांबणीवर पडू शकतात. त्यामुळे नाराज होण्याची गरज नाही.. अविरत प्रयत्न करीत राहा. यश मिळेल.
तूळ : मन आशावादी, उत्साही आणि आनंदी राहील. नियोजनाप्रमाणे कार्ये पूर्ण होतील. महत्वाच्या भेटीगाठी चडून पत्रव्यवहार पूर्ण होतील.
वृश्चिक : शक्यतो महत्त्वाची कामे पुढे ढकलणे हिताचे ठरेल. वाद-विवाद टाळा. इतरांच्या मतांना प्राधान्य द्या. आपली प्रतिक्रिया लगेचच देणे टाळा.
धनु : कलाकार, साहित्य क्षेत्रातील मंडळी व बौद्धिक क्षेत्रातील कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना चांगला दिवस. अनपेक्षित यश मिळू शकते.
मकर : शासकीय योजनांचा फायदा मिळू शकतो. तसेच शासकीय कामात यश मिळेल. विनाविलंब कामे झाल्याने आश्चर्यचकित व्हाल.
कुंभ : आरोग्य चांगले राहील. कुटुंबातून सुखदायक वार्ता मिळतील. मुलांची प्रगती होईल. मनोबल व आत्मविश्वास वाढेल.
मीन : व्यवसायातील दीर्घकाळ प्रलंबित असणारी येणी वसूल होतील. आर्थिक परिस्थिती सुधारेल. व्यवसायातील तुमचे निर्णय अचूक ठरतील.