[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष : आर्थिक स्थिती चांगल्या प्रमाणात सुधारेल. मात्र, त्याचवेळी खर्चाचे प्रमाणदेखील वाढलेले असेल. त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ : मानसिक शांतता मिळण्याची शक्यता. जे आपली परिस्थिती समजू शकतात, अशा जवळच्या मित्रांबरोबर बाहेर फिरायला जा.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन : काळजी करू नका. दु:ख बर्फाप्रमाणे वितळून जाईल. तुमच्या योजना आहे तशा राबविण्यासाठी भागीदारांना पटवून द्यावे लागेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क : पैसे व्यर्थ खर्च करू नका. रंजक गोष्टींच्या मागे धावू नका, सत्यस्थितीचा विचार करण्याचा प्रयत्न करा. मनावर ताबा ठेवा.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह : झटपट पैसा कमावण्याची इच्छा होईल. घरातील सुधारणाच्या कामांचा गांभीर्याने विचार करा. कोणताही निर्णय घेताना काळजी घ्या.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""] कन्या : तुम्ही प्रभावी स्थितीत असाल. तुमच्यापैकी काही जण दूरच्या प्रवासासाठी रवाना व्हाल. त्यामुळे तुम्हाला दगदग होईल. आरोग्याची काळजी घ्या.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ : वेळ वाया घालवू नका. त्यापेक्षा आयुष्याचे धडे गिरवा. मेहनत केली तर यश निश्चित मिळेल, कारण आजचा दिवस तुमचाच आहे.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक : दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल. जोडीदाराबरोबर योग्य तो ताळमेळ साधल्यास घरी सुख-समृद्धी व शांतता नांदेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु : काही प्रकारची दुर्घटना होण्याची शक्यता आहे, म्हणून सावधान राहा. तुमचा जोडीदार हा देवदूतच आहे आणि याची जाणीव होईल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""] मकर : प्रयत्न आणि झोकून देण्याच्या वृत्तीमुळे कुटुंबातील लोक कौतुक करतील. प्रेम हे नेहमीच चैतन्य देणारे असते आणि याचा अनुभव मिळेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ : मान्यवर श्रेष्ठ व्यक्तींबरोबरच्या चर्चेमुळे नव्या कल्पना सुचतील. घरातील लहान सदस्यांसोबत वेळ घालवणे शिकले पाहिजे.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन : धावपळीमुळे तुम्हाला स्वतःसाठी पर्याप्त वेळ मिळेल आणि तुम्ही आपल्या आवडत्या कामाला करण्यात यशस्वी व्हाल.[/box]
– ज्यो. मंगेश महाडिक