आजचे राशिभविष्य  
Latest

आजचे राशिभविष्य (दि.६ जुलै २०२३)

मोहन कारंडे
मेष

मेष : कलात्मक छंद तुम्हाला आराम मिळवून देतील. अनोळखी कुणी व्यक्ती तुमच्या घरी येऊ शकतो, त्यामुळे तुम्हाला सामान खरेदी करावे लागू शकते.

वृषभ

वृषभ : तंदुरुस्ती आणि वजन घटविण्याचे उपक्रम शरीरास चांगला आकार देण्यासाठी उपयोगी ठरतील. आजचा दिवस आर्थिक दृष्टीने चांगला राहील.

मिथुन

मिथुन : इतरांबरोबर आनंद वाटून घेण्याने आपले आरोग्य बहरून जाईल. कुणी जुना मित्र आज तुमच्याकडून आर्थिक मदत मागू शकतो.

कर्क

कर्क : कोणत्याही प्रकारे तुमची ताकद कमी पडतेय असे नाही तर तुमची इच्छाशक्ती कमी पडतेय. तुमची खऱ्या क्षमता काय आहेत ते ओळखा.

सिंह

सिंह : महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय घेताना दुसऱ्यांच्या दडपणाखाली वावरू नका. रिकाम्या वेळेचा योग्य उपयोग करण्यासाठी जुन्या मित्रांना भेटा.

कन्या

कन्या : तुमच्या ओळखीच्या व्यक्तीला तुम्हाला योग्य वाटेल तो निर्णय घेण्यासाठी जबरदस्ती केलीत तर तुम्ही तुमच्या हितालाच बाधा आणाल.

तुळ

तूळ : अलीकडे घडलेल्या घटनांमुळे तुमचे चित्त विचलित होईल. ध्यानधारणा आणि योगासने यामुळे तुम्हाला शारीरिक व अध्यात्मिक फायदा होईल.तुळ : आपल्या आधारावर अनेक गोष्टी अवलंबून असतील आणि मनाची स्पष्टता निर्णय घेण्यासाठी महत्त्वाची असेल. मित्र सल्ल्याची अपेक्षा धरतील.

वृश्चिक

वृश्चिक : प्रवासामुळे तुम्ही त्रासून जाल. अनोळखी व्यक्तीच्या सल्ल्यावर काही धन गुंतवणूक केली होती, त्यांना त्या गुंतवणुकीचा फायदा होण्याची शक्यता.

धनु

धनु : कोणत्याही कामासाठी उद्या खूप उशीर झालेला असेल. अनुभवी लोकांसाठी वेळ काढा आणि त्यांना काय म्हणायचे आहे हे जाणून घ्या.

मकर

मकर : तुमचा मनमोहक स्वभाव आणि आनंदी व्यक्तिमत्त्वामुळे तुम्ही नवीन मित्र जोडाल आणि त्यांच्याशी संपर्क वाढवाल. दिवस आनंदात जाईल.

कुंभ

कुंभ : आपल्या जोडीदाराने दिलेले वचन पाळले नाही म्हणून त्यावर उखडू नका. शांतपणे एकत्र बसून विचार करून गुंता सोडविणे गरजेचे आहे.

मीन

मीन : आजच्या दिवशी आपल्या आरोग्याची कसलीही काळजी करण्याची गरज नाही. आपल्या सभोवतालचे लोक आपले मनोधैर्य आणि चैतन्य वाढवतील.

– ज्यो. मंगेश महाडिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT