आजचे राशिभविष्य  
Latest

आजचे राशिभविष्य (दि. ९ ऑगस्ट २०२३)

निलेश पोतदार

मेष ः संवेदनशील वागण्याने आयुष्याला अर्थ प्राप्त होतो, हे ध्यानात ठेवा. तुम्ही कीती काळजी करता, हे वागण्यातून इतरांना दिसू द्या.

वृषभ ः कार्यालयातील वरिष्ठ तसेच सहकार्‍यांच्या पाठिंब्यामुळे मनोधैर्य वाढेल. अध्यात्मिक गुरू अथवा वडीलधार्‍यांकडून मार्गदर्शन लाभेल.

मिथुन ः स्वत:च्या जीवावरच काम खेचून नेत आहात, असे चित्र असेल. सहकारी मदतीस येतील; पण ते फार मदत करू शकणार नाहीत.

कर्क ः तुमच्या प्रेमाच्या वाटेला आज एक नवे सुंदर वळण मिळणार आहे. आज तुम्हाला प्रेमाचा स्वर्गीय आनंद प्राप्त होणार आहे.

सिंह ः तुमच्या जवळच्या माणसांबरोबर कोणताही वादविवाद छेडू नका. वादग्रस्त मुद्दे असतील, तर ते परस्पर संमतीने सोडवा.

कन्या ः इतरांवर प्रभाव टाकण्याची क्षमता बक्षीस मिळवून देईल. शृंगारिक कल्पनांची स्वप्ने पाहण्याची गरज नाही.

तूळ ः नातेवाईकांडून आलेली बातमी तुमचा दिवस उजळून टाकेल. प्रिय व्यक्तीने दुस्वास केला, तरी तुम्ही प्रेमाने वागा.

वृश्चिक ः चैनीसाठी पैशांची उधळपट्टी होणार नाही, याची काळजी घ्या. वर्चस्ववादामुळे वायफळ वादावादी आणि टीका संभवते.

धनु ः तुमच्या प्रिय व्यक्तीकडे तुमच्या भावना व्यक्त करण्यात अपयशी ठराल. कामाच्या ठिकाणी आजचा दिवस खूप सुंदर असेल.

मकर ः प्रकृती सुधारा आणि चांगले आयुष्य जगण्यासाठी व्यक्तिमत्त्व बदला. पैशामुळे आज अनेक समस्या निर्माण होतील.

कुंभ ः जुन्या मित्रांबरोबरील भेटीगाठींमुळे उत्साह वाढेल. घरातून बाहेर जाताना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघा. यामुळे धन लाभ होऊ  शकतो.

मीन ः योजना बारगळविण्यासाठी कुणीतरी प्रयत्न करतील, म्हणून अवतीभवतीची माणसे काय करत आहेत, याकडे लक्ष ठेवा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT