मेष : सामाजिक कार्यात भाग घ्याल. लोकांसाठी खर्च कराल. मित्रमंडळींच्या वर्तुळात कोणाला तरी मदतीची गरज भासू शकते.
वृषभ : आप्तेष्ट, नातेवाईक यांच्या भेटीगाठी होतील. कुटुंबात एखाद्या धार्मिक कार्यक्रमानिमित्त सर्वांची भेट होईल. दिवस आनंदात जाईल.
मिथुन : जुने मित्र-मैत्रिणी भेटतील. नवीन लोकांच्या ओळखी होतील. या ओळखींचा उपयोग जुनी कामे पूर्ण करण्यासाठी होऊ शकेल.
कर्क : भाग्याची साथ मिळाल्यामुळे अवघड कामे होतील. महत्त्वाच्या भेटीगाठी होतील. धनलाभाचे योग. कुटुंबात आनंदी वातावरणाचा लाभ मिळेल.
सिंह : एखाद्या सामाजिक समारंभास उपस्थित राहावे. तेथे एखादे मानाचे पद भूषवू शकाल. कौटुंबिक समाधान मिळेल. मुलांकडून शुभवार्ता समजेल.
कन्या : अपेक्षित पत्रव्यवहार साध्य होईल. प्रवासाचे योग. सहकुटुंब एखाद्या धार्मिक पवित्र स्थळी भेट द्याल. गुरुकृपा मिळेल.
तूळ : अचानक धनलाभ होण्याची शक्यता. पूर्वी घेतलेल्या कष्टाचे फळ मिळेल. नवीन कामे मिळू शकतात. समाधानी राहाल.
वृश्चिक : एखाद्या विषयात आपल्या धाडसी निर्णयामुळे आपल्याला फायदा होईल. आपल्या शब्दाला प्राधान्य मिळेल.
धनु : समाजातील गुरुतुल्य व्यक्ती भेटतील. त्यांच्या विचारांनी आपण प्रभावित व्हाल. आध्यात्मिक व धार्मिक कार्यात सक्रिय योगदान द्याल.
मकर : महत्त्वाची आणि मोठी कार्ये गतिमान होतील. जमीनजुमल्या संदर्भातील आणि जमिनीविषयक व्यवहार पूर्ण होण्याच्या मार्गावर असतील.
कुंभ : कुटुंबातील सदस्यांच्या सर्व गरजा पूर्ण करू शकाल. अर्थमान चांगले राहील. घरातील लोकांबरोबर उत्तम काळ घालवाल. शुभवार्ता मिळतील.
मीन : मनोरंजनाकडे कल असेल. मित्रमंडळींबरोबर आनंदात वेळ घालवण्याची संधी मिळेल. प्रिय व्यक्तींचा सहवास मिळेल.
ज्यो. मंगेश महाडिक