Latest

‘तृणमूल’च्‍या मिमी चक्रवर्ती यांनी दिला खासदार पदाचा राजीनामा

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : तृणमूल काँग्रेसच्या मिमी चक्रवर्ती यांनी खासदार पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. ( TMC MP  Mimi Chakraborty announces resignation from party )

मिमी चक्रवर्ती यांनी २०१९ लोकसभा निवडणुकीत जाधवपूर मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती. त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला असून, जाधवपूर मतदारसंघातून निवडणूक लढवू शकत नसल्याचे स्‍पष्‍ट केले आहे. स्थानिक पातळीवरील पक्षातील नेत्‍यांवरील नाराजी मुळे मिमी चक्रकवर्ती यांनी हे पाऊल उचलले आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. दरम्‍यान, मिमी चक्रवर्ती त्‍यांनी आपला राजीनामा लोकसभा अध्यक्षांकडे पाठवला नसल्‍याने हा औपचारिक राजीनामा म्हणून गणला जाणार नाही.

राजकारण माझ्‍यासाठी नाही

मिमी चक्रवर्ती यांनी म्‍हटले आहे की, "राजकारण हे माझ्यासाठी नाही. तुम्हाला  राजकारणात कोणाचा तरी प्रचार करावा लागताे. राजकारणी असण्यासोबतच मी एक अभिनेत्री म्हणूनही काम करते. राजकारणात आल्यास तुम्ही काम करा किंवा न करा तुमच्यावर टीका केली जाते. मी याबाबत ममता बॅनर्जी यांच्याशी बोलले. मी त्यांना २०२२ मध्येच खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यांनी तो फेटाळला होता. आताही त्‍यांच्‍या आदेशानुसार मी मी पुढील प्रक्रिया पूर्ण करेन."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT