Latest

Titas Sadhu : दुसर्‍याच सामन्यात असाधारण कामगिरी करणारी तितास साधू कोण आहे?

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : 19 व्या आशियाई खेळांमध्ये (Asian Games 2023) सोमवारी भारतीय महिला विरुद्ध श्रीलंका महिला क्रिकेट सामन्यात (IND vs SL) भारताची युवा गोलंदाज तितास साधूने (Titas Sadhu) 8 चेंडूंत 3 विकेटस् घेत श्रीलंकेला अडचणीत आणले. कारकिर्दीतील दुसराच सामना खेळणार्‍या तितासने भारताला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली.

श्रीलंकेच्या टॉप ऑर्डरला अवघ्या 8 चेंडूंत केले गारद

भारताची युवा गोलंदाज तितास साधू (Titas Sadhu) ही उजव्या हाताची वेगवान गोलंदाज आहे. अंतिम सामन्यात तिने धारदार कामगिरी करत भारताच्या विजयाचा पाया रचला. तिने श्रीलंकेच्या टॉप ऑर्डरला अवघ्या 8 चेंडूंमध्ये बाद केले. तिने घेतलेली दुसरी विकेट म्हणजे क्लीन बोल्ड पाहण्यासारखा होता. सामन्यातील दुसर्‍या आणि चौथ्या षटकांत तिने या महत्त्वाच्या विकेटस् मिळवत सुरुवातीलाच श्रीलंकेला बॅकफूटवर आणले. तितासने श्रीलंकेची कर्णधार चमारी अथुपाथू हिला झेलबाद करवत भारताला मोठी विकेट मिळवून दिली.

तितास साधू (Titas Sadhu) भारताच्या अंडर-19 विश्वचषक 2023 संघाचा भाग होती. या स्पर्धेच्या अंतिम फेरीतही ती सामनावीर ठरली होती. त्या सामन्यात तितास साधूने 5 षटकांत केवळ 6 धावा देत 2 महत्त्वाचे बळी घेतले. तर सोमवारच्या सामन्यात तिने 4 षटकांत 3 विकेटस् घेत अवघ्या 6 धावा दिल्या.

झुलन गोस्वामीला मानते आदर्श

तितासला (Titas Sadhu) भावी स्टार खेळाडू मानले जात आहे. मूळची पश्चिम बंगालची असलेली तितास नवीन आणि जुन्या चेंडूवर चमकदार गोलंदाजी करू शकते. ती पश्चिम बंगालमधील चिनसुरा येथील रहिवासी आहे. वडील रणदीप साधू यांच्याकडून तिने क्रिकेटचे धडे गिरवले. तितासची आदर्श माजी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी आहे, जी बंगालची आहे.

चिनसुराच्या मैदानावर क्रिकेटचा सराव करून ती येथे पोहोचली आहे. तितासकडे उत्कृष्ट वेग आहे, ज्यामुळे तिची सीम स्थिती इतर गोलंदाजांपेक्षा वेगळी आहे. या सर्वांसह तिच्याकडे चांगले नियंत्रण आहे. झुलननंतर, 'एनसीए'मधील जगातील सर्वोत्तम प्रशिक्षकांनी तिच्या गोलंदाजी प्रतिभेला आकार दिला आणि तिला आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी तयार केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT