Latest

Tina Dabi : IAS टीना डाबींच्या भावी पतीची लग्नापूर्वीच बदली!

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयएएस (IAS) टीना डाबी (Tina Dabi) आणि प्रदीप गावंडे (Pradeep Gawande) लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. दोघेही राजस्थान केडरचे आयएएस अधिकारी आहेत. दरम्यान, राजस्थान सरकारने प्रशासकीय फेरबदल करताना सर्व अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. या बदली यादीत आयएएस प्रदीप गावंडे यांचेही नाव आहे.

नेहमीच चर्चेत असलेल्या आयएएस टीना डाबी (Tina Dabi) आणि आयएएस प्रदीप गावंडे (Pradeep Gawande) यांचा नुकताच साखपुडा पार पडला. लवकरच ते लग्न करणार आहेत. पण त्याआधीच प्रदिप यांची राजस्थान सरकारने बदली केली आहे. आता सचिवालयात दिसणार आहेत. प्रदिप हे यापूर्वी पुरातत्व व वस्तुसंग्रहालय (जयपूर) विभागात संचालक म्हणून कार्यरत होते. आता त्यांची पोस्टिंग सहसचिव, उच्च शिक्षण विभाग (जयपूर) येथे झाली आहे.

दुसरीकडे, टीना डाबी या सध्या राजस्थान वित्त विभागात सहसचिव आहेत. टीना यांच्यानंतर आता त्यांचे भावी पती प्रदीप गावंडेही सचिवालयात आले आहेत. अलीकडेच टीना आणि प्रदीप यांनी सोशल मीडियाला टाटा केले होते. त्यामुळे त्यांचे चाहते प्रचंड निराश झाले होते. टीना यांनी त्यांचे इन्स्टाग्राम आणि फेसबुक अकाउंट डिअॅक्टिव्हेट केले होते, तर प्रदीप गावंडे यांनीही त्यांचे इन्स्टाग्राम अकाउंट डिअॅक्टिव्हेट करून सोशल मीडियाचा निरोप घेतला होता.

जाणून घ्या प्रदीप गावंडे यांच्याबद्दल…

मूळचे महाराष्ट्राचे असलेले प्रदीप गावंडे हे 2013 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्यापूर्वी त्यांनी एमबीबीएसची पदवी मिळवली होती. ते चुरू जिल्ह्याचे जिल्हाधिकारीही राहिले आहेत. 22 एप्रिल रोजी ते यूपीएससी टॉपर आणि आयएएस टीना डाबी यांच्यासोबत लग्न करणार आहेत. टीना (Tina Dabi) यांचे हे दुसरे लग्न आहे, तर प्रदीप यांचे पहिले. प्रदीप आणि टीना यांच्यात 13 वर्षांचे अंतर आहे.

टीना डाबी (Tina Dabi) यांनी पहिले लग्न आयएएस आमिर अथर खान यांच्याशी केले होते. मात्र, काही कारणांमुळे हे नाते फार काळ टिकू शकले नाही आणि नंतर दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT