Latest

राजगुरुनगर : तीन गावठी पिस्तुल, ३० जिवंत काडतुसे जप्त; दोघांना अटक

अमृता चौगुले

राजगुरुनगर; पुढारी वृत्तसेवा : खेड तालुक्यातील शिरोली पाईट रस्त्यावर बुलेटवरून जाणाऱ्या दोन युवकांकडून ३ गावठी पिस्तुलासह ६ मॅकझीन व तब्बल ३० जिवंत काडतुसे पोलिसांनी रविवारी (दि. २०) उशिरा रात्री जप्त केली. या दोन आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे. आकाश आण्णा भोकसे (वय २३) आणि महेश बाबाजी नलावडे (वय २३, दोघेही रा. कुरकुंडी, ता. खेड) अशी आरोपीची नांवे आहेत. रविवारी रात्री गस्तीवर असलेल्या पोलिसांना शिरोली बाजूकडून किवळेकडे जाणाऱ्या पाईट रस्त्यावर दोन युवक काळया रंगाच्या बुलेटवरून जात असुन त्यांच्याजवळ गावठी बनावटीचे पिस्टल असल्याची माहिती मिळाली होती.

पोलिसांनी सापळा रचून त्यांना थांबवले. दोघांची अंगझडती घेतली असता आकाश भोकसे यांच्या कंबरेला खोचलेले दोन्ही बाजूस २ लोंखडी गावठी पिस्टल मॅकझीनसह मिळून आले. तसेच पॅन्टच्या खिशात २ मॅकजीन जिवंत काडतुसे भरलेल्या मिळून आल्या. सोबत असलेला त्याचा मित्र महेश नलावडे याच्या कंबरेला १ गावठी पिस्टल मॅकझीनसह मिळून आले. तसेच खिशात १ जिवंत काडतुसे भरलेली मॅकझीन मिळून आली.

दोन्ही आरोपीकडून ३ गावठी पिस्टल आणि ३ मॅकझीन प्रत्येकी ५ जिवंत काडतुसे भरलेल्या आणि पिस्टलमधे प्रत्येकी ५ जिवंत काडतुसे भरलेली अवस्थेत मिळून आली. असा १ लाख ६१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पोलीस अधिक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गद्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, नेताजी गंधारे, शिवाजी ननवरे, गणेश जगदाळे, विक्रमसिंह तापकीर, विजय कांचन, अमोल शेडगे, बाळासाहेब खडके, धिरज जाधव , निलेश सुपेकर दगडू वीरकर यांच्या ही पथकाने ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT