मुंबई : पुढारी वृत्तसेवा : बोरिवली पश्चिमेकडील कल्पना चावला चौक, सोनी वाडी येथील निर्माणधिन इमारतीची १६ व्या मजल्यावरील मचान कोसळून ४ कामगार ठार झाल्याची दुर्घटना आज (दि.१२) दुपारी २.३५ च्या दरम्यान घडली. या दुर्घटनेत मनोरंजन समाज (वय ४२), शंकर बैद्य (वय २५), पियुष हरदार (वय ३८) यांचा जागीच मृत्यू झाला. तर सुशील गुप्ता (वय ३५) हे गंभीर जखमी झाले असून यांच्यावर कांदिवलीतील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर रूग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनास्थळी अग्निशामन दल आणि पोलीस दाखल झाले असून घटनेची माहिती घेत आहेत.
सोनीवाडी येथील एका तळमजला ते २४ मजली इमारतीचे काम सुरु आहे. हे काम सुरु असताना अचानकपणे मचान कोसळली. या मचानवर काम करणारे चार कामगार १६ व्या मजल्यावरून जमिनीवर कोसळले. यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर असून त्याच्यावर पालिकेच्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे आपत्तकालीन विभागाकडून सांगण्यात आले.
हेही वाचा :