बारामती : शहरातील देशपांडे ईस्टेट भागातील करण आयकाॅन या इमारतीत चोरट्यांनी बंद सदनिका फोडत रोख रकमेसह दीड लाखांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात वैशाली विकास तोडकर यांनी फिर्याद दिली. फिर्य़ादी यांचे शहरातील सराफ-पोटे काॅम्प्लेक्समध्ये दुकान आहे. नेहमीप्रमाणे सव्वा दहाला त्या घराला कुलुप घालून दुकानाकडे गेल्या. शेजारी राहणाऱयांनी दुपारी त्यांना फोन करत सदनिकेचा दरवाजा उघडा दिसत असून दरवाजाची कडी तुटली असल्याचे सांगितले. फिर्य़ादीने घरी जात पाहणी केली असता कडी तोडण्यात आल्याचे दिसले. घराची पाहणी केली असता लोखंडी कपाटातून दीड लाखांचा एेवज चोरीला गेल्याचे दिसून आले. शहर पोलिसांनी याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.