बुद्धी, शक्ती आणि भक्ती यांचा सुंदर समन्वय पाहायचा असेल तर 'श्रीरामभक्त हनुमंता'कडेच पाहावे. विद्वत्ता, बलोपासना, शौर्य आणि भक्तीसारख्या असंख्य गुणांचा सागर असलेल्या मारुतीरायाच्या जन्माचा महन्मंगल उत्सव आज देश-विदेशात भक्तिभावाने साजरा होत आहे. देशात आणि परदेशातही मारुतीच्या अनेक उंच मूर्ती आहेत. त्यापैकी भारतातील काही उंच मूर्तींची ही माहिती…
देशातील सर्वात उंच हनुमानाची मूर्ती आंध— प्रदेशातील नरसन्नपेटामधील मंडपमजवळ आहे. या मूर्तीची उंची तब्बल 176 फूट आहे.
ओडिशातील दमंजोडी येथे ही भव्य मूर्ती आहे. तिची उंची 108 फूट 9 इंच आहे.
आंध— प्रदेशातच कृष्णा जिल्ह्यात 'वीर अभय आंजनेय हनुमान स्वामी' ही मूर्ती आहे. ती देशातील दुसर्या क्रमांकाची सर्वात उंच हनुमान मूर्ती असून तिची उंची 135 फूट आहे.
महाराष्ट्रात बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथे 105 फूट उंचीची हनुमान मूर्ती आहे.
कर्नाटकातील अगरा येथे ही भव्य मूर्ती आहे. ती 102 फूट उंचीची आहे.
दिल्लीच्या करोल बागेत ही संकटमोचक हनुमानाची मूर्ती आहे. ती 108 फूट उंचीची आहे.
हिमाचल प्रदेशात सिमलामधील प्राचीन जाखू मंदिरात ही मूर्ती आहे. या मूर्तीची उंची 108 फूट आहे.
दिल्लीच्या दक्षिणेस छतरपूर मंदिराच्या आवारात ही मूर्ती असून ती 100 फूट उंचीची आहे.
उत्तर प्रदेशात शाहजहानपूरमधील हनुमान धामात ही मूर्ती आहे. तिची उंची 104 फूट आहे.